या मार्गावरुन दोन्ही बाजूने शेती आहे. रस्ता पूर्णपणे उखडलेला असल्याने शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी सुद्धा तारेवरची कसरत करावी लागत आहे. देव्हाळा येथे पेपर मिल असल्यामुळे अनेक मजूर या कारखान्यात रात्री बेरात्री या रस्त्याने कामावर जातात. शाळकरी विद्यार्थी तुमसर येथील कॉलेजमध्ये याच मार्गाने जातात. तुमसर आगाराची तुमसर ते तिरोडा व्हाया घोगरा मार्गे ही बस सेवा सुरु होती. पण ही बस सेवा रस्त्याअभावी बंद करण्यात आली. घोगरा ते देव्हाळा या गावावरुन गोंदिया ते नागपूरकडे बस धावत असतात. यावेळी रेती भरलेले टिप्पर व ट्रॅक्टर या मार्गाने नेहमीच ये-जा करीत असतात. त्यामुळे या मार्गाची अधिक दुरवस्था झाली आहे. परिणामी या मार्गावरील अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. या मार्गावरील अपघातांच्या संख्येत सुद्धा वाढ झाली आहे. लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास गावकऱ्यांना व इतर गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
घोगरा ते देव्हाळा मार्गावर खड्डेच खड्डे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:36 AM