लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. शेतीतून जास्तीत जास्त प्रकारचे पिके कसे घेता येतील यासाठी मार्गदर्शन करु न शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचे नियोजन करा. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी (दि.२९) खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित खरीप हंगाम सन २०१९-२० च्या आढावा बैठकीला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदिकशोर नाईनवाड, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिलीप सिल्हारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, जिल्हा उपनिबंधक कांबळे, प्रभारी कृषी विकास अधिकारी झामिसंग टेंभरे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई उपस्थित होते.डॉ. बलकवडे म्हणाल्या, राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी शेतकरी सभासदांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी मागणी केलेल्या शेतकऱ्यांना कृषी पंपांना तातडीने वीज जोडून देण्यात यावी.जिल्ह्यातील जे शेतकरी शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करुन अधिक उत्पन्न घेतात त्यांच्या यशोगाथा इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचिवण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्यास सांगितले.प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाईनवाड यांनी सन २०१८-१९ या वर्षात खरीप हंगामात केलेल्या कामाची माहिती देवून खरीप हंगाम सन २०१९-२० या वर्षाचे नियोजन सादर केले.१३०० हेक्टरवर ज्वारीची लागवड होणारयंदा रब्बी हंगामात ज्वारीचे १३०० हेक्टरवर आणि करडईचे ६५० हेक्टरवर लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. ज्वारी लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाला पर्यायी पिकाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.४३२ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटपजिल्ह्यात सन २०१८-१९ या वर्षात कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४३२ ट्रॅक्टर आणि ३१२ भात मळणी यंत्र, रोटावेटर, कल्टीवेटर, भात कापणी यंत्र व मिनी राईस मिल देण्यात आले आहे. यासाठी ६ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचे नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 9:16 PM
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. शेतीतून जास्तीत जास्त प्रकारचे पिके कसे घेता येतील यासाठी मार्गदर्शन करु न शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचे नियोजन करा. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी (दि.२९) खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : खरीप हंगाम आढावा बैठक