शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट

By admin | Published: May 17, 2017 12:18 AM

तिरोडा तालुक्यातील मोठी बाजार पेठ असून या बाजार पेठेत माफीया राज सुरू असून कृषी उत्पन्न बाजार समिती

मोजणीसाठी शेतकऱ्यांनाच खर्च : पिण्याच्या पाण्याजवळ दुर्गंध लोकमत न्यूज नेटवर्क परसवाडा : तिरोडा तालुक्यातील मोठी बाजार पेठ असून या बाजार पेठेत माफीया राज सुरू असून कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण भ्रष्टाचाराच्या कचाट्यात सापडलेली आहे. त्यामुळेच संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त झाले. पण आजही भ्रष्टाचारात लपलेले शेतकरी विरोधी प्रशासक म्हणून राज्य करीत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत धान विक्रीसाठी गेले असता संपूर्ण फेरफटका मारुन शेतकऱ्यांशी हितगुज व्यापाऱ्यांशी बसून कर्मचारी वर्गाशी गप्पा गोष्टी करुन संपूर्ण माहिती घेतली असता या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हिताचा एकही संचालक मंडळाने व मुख्य प्रशासकाने निर्णय घेतला नसल्याचे चित्र दिसले. यात शेतकऱ्यांची लूट होतच असल्याचे दिसले. शासनाने दलाली, मोजाई, पोती भराई शेतकऱ्यांकडून घेणे बंद केले. पण आजही तीन रुपये धानाचे प्रती बोरे भराई घेणे शेतकऱ्यांकडून सुरू आहे. याकडे सहकार निबंधक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक चिंतामन रहांगडाले यांचे दुर्लक्ष असून स्वत: दलाल असून भावाच्या नावाने कारभार करतात. त्यांनीच प्रती तीन रुपये भराई व दलाली सुरू ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे काही व्यापारी, हमाल, शेतकरी वर्गाने सांगितले. पिण्याच्या पाण्याजवळ नाली असून त्याठिकाणी पाण्याचे माठ ठेवले आहेत. त्या जवळील नालीची सफाई कित्येक वर्षापासून झाली नाही हे त्यांनाच ठाऊक. शेतकऱ्यांना तेथेच जाऊन पाणी प्यावे लागते. पण याकडे प्रशासक मंडळाचे संपूर्ण दुर्लक्ष पण आहे. या बाजारपेठेत नाली तिथेच धानाची बोली बोलली जाते व शेतकरी बसतात. याकडे सहकार निबंधक, जिल्हाधिकारी लक्ष देतील काय अशा प्रश्न शेतकरी करीत आहेत.