शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 6:00 AM

खरीप हंगामाच्या उत्पादित धानपिकाची खरेदी सुरु झाली आहे. धान खरेदी केंद्रांवर शेतकºयांची लूट केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. निसर्गाच्या कोपामुळे आधीच हवालिदल झालेला शेतकरी कंगाल तर संस्थाचालक मालामाल होत आहेत. यंत्रणा मात्र घोंगडे पांघरूण झोपेचे ढोंग करीत असल्याचा प्रकारही पुढे आला.जिल्ह्यात आधारभूत हमीभावाने शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यासाठी जिल्हा पणन अधिकारी व आदिवासी महामंडळ अशा दोन मुख्य एजन्सी आहेत.

ठळक मुद्देशेतकरी कंगाल अन् संस्थाचालक मालामाल : दोन्ही विभागाची दक्षता पथके गेली कुठे, कारवाई करणार कोण

संतोष बुकावन।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप हंगामातील धान खरेदी करतांना खरेदी केंद्रासाठी एक नियमावली तयार केली आहे.यानुसार शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, आदिवासी विकास महामंडळाला दिले. याचे खरेदी केंद्रावर कितपत पालन केले जात आहे, धान खरेदी करणारी यंत्रणा किती सजग आहे आणि खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कशी लूट केली जात आहे. यासर्व गोष्टींची चाचपणी लोकमतने मंगळवारी (दि.१९) धान खरेदी केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन स्टिंग ऑपरेशन केले.त्यात अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या.खरीप हंगामाच्या उत्पादित धानपिकाची खरेदी सुरु झाली आहे. धान खरेदी केंद्रांवर शेतकºयांची लूट केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. निसर्गाच्या कोपामुळे आधीच हवालिदल झालेला शेतकरी कंगाल तर संस्थाचालक मालामाल होत आहेत. यंत्रणा मात्र घोंगडे पांघरूण झोपेचे ढोंग करीत असल्याचा प्रकारही पुढे आला.जिल्ह्यात आधारभूत हमीभावाने शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यासाठी जिल्हा पणन अधिकारी व आदिवासी महामंडळ अशा दोन मुख्य एजन्सी आहेत.जिल्हा पणन अधिकारी यांनी खरीप हंगामातील आधारभूत किंमत धान खरेदी योजना ४ नोव्हेंबरच्या पत्रानुसार सुरू केली आहे. आदिवासी विकास महामंडळाचे अर्जुनी मोरगाव तालुक्यात केशोरी हे एकमेव केंद्र वेळेवर सुरू झाले. गोठणगाव, ईळदा हे केंद्र १६ नोव्हेंबर रोजी सुरू झाले. बाराभाटी हे केंद्र अद्याप सुरू न होण्यामागील कारण गुलदस्त्यात आहे. यामुळे परिसरातील शेतकºयांची मात्र पुरती कोंडी होत आहे. हे केंद्र लवकर सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.धान खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब होत असल्याने उसनवारी करून दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र दिवाळे निघाले.वातानुकूलित खोलीत बसून निर्णय घेणारी यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प आहे. जिल्हा पणन अधिकारी यांचे अंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सह संस्था अर्जुनी, लक्ष्मी भात गिरणी अर्जुनी, खरेदी विक्री संस्था अर्जुनी, नवेगावबांध, महागाव, वडेगाव, बोंडगावदेवी, धाबेटेकडी व बाकटी असे धान खरेदी केंद्र आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्याला धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते.जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे उत्पादन याच तालुक्यात होते.एका वर्षात साधारणत: सव्वा दोन लक्ष क्विंटल धानाचे उत्पादन होते. यावर्षी खरीप हंगामात धान कापणी झाल्यावर अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले.जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी केली. अद्याप मदत मिळाली नाही.त्यातही शेतकऱ्यांच्या नावाने असलेल्या धान खरेदी करणाºया काही संस्था शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खात आहेत.ईलेक्ट्रानिक नव्हे साध्या वजन काट्यावर मोजमापबोरी येथे सुरू असलेल्या केंद्रावर साध्या वजन काट्याने मोजमाप होत आहे. याठिकाणी इलेक्ट्रॉनिक वजन काट्याने खरेदी सुरू असल्याचे खरेदी विक्र ी समिती सांगत आहे. इलेक्ट्रॉनिक वजनकाटे वारंवार चार्जिंग करावे लागते हा बहाणा धान खरेदी केंद्राचालक सांगण्यास विसरत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांचे कसे उल्लघंन केले आहे हे सुध्दा उघडकीस आले.ओलाव्याच्या नावावर अडीच किलो धानाची कपातओलाव्याच्या नावावर बोरी केंद्रावर ४० किलोमागे चक्क दोन ते अडीच किलो अधिक धान शेतकऱ्यांकडून घेतले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा प्रकार अजिबात नवीन नाही मात्र शेतकरी मुकाट्याने सहन करतात ही खरी शोकांतिका आहे. या प्रकारातून संस्था पाहिजे तेवढ्या मोठ्या झाल्याचे दिसून येत नाही. मात्र काही संस्थाचालक गब्बर झाले आहेत.दरवर्षी जिल्ह्यात होणारा हा सर्वात मोठा घोटाळा आहे.अधिकारी, कर्मचारी नावापुरतेचधान खरेदी केंद्रावर कुठलाही गैरप्रकार होऊ नये,यासाठी दक्षता पथके आणि अधिकारी कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.मात्र खरेदी केंद्रावर सर्रापणे नियमांचे उल्लघंन केले जात असल्याने नावापुरते देखरेखीसाठी पणन विभागाचे कर्मचारी नियुक्त असतात. त्यांच्या डोळ्यात धूळ झोकून हा प्रकार केला जात आहे. मांजरीसारखे डोळे मिटून दूध पिण्यातच ते धन्यता मानतात.अशी होतेय केंद्रावर लूटअर्जुनी मोरगाव तालुक्यात काही धान खरेदी केंद्रांवर साध्या वजन काट्यावर धान मोजणी केली जाते. इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे असतांना साध्या काट्यावर मोजणी का हाच खरा संशोधनाचा विषय आहे. इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यातही सेटिंग केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. धानाचा कट्टा ४० किलोचा असतो.तो मोजणी करतांना तोलारी ४१ ते ४२ किलो वजन घेतात. एका कट्याच्या मोबदल्यात दोन कट्टे मांडतात शिवाय कट्टा जमिनीला टेकेल एवढे झुकते माप घेतले जाते.४० किलोच्या कट्टयावर एक किलो पासंग गृहीत धरले तर एका क्विंटलवर अडीच किलो अधिकचे माप घेतले जाते.ओलाव्याच्या नावावर शेतकऱ्यांना धरले जाते वेठीसओलाव्याचे प्रमाण अधिक असल्याचे कारण सांगून धान परत न्या व पुन्हा वाळवून नंतर खरेदी केंद्रावर आणा असेही ग्रेडरांकडून शेतकºयांना सांगितले जात असल्याच्या तक्रारी आहेत. ते शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नसते.म्हणजे शेतकऱ्यांनी वाहतुकीचा खर्च करून शेतातून केंद्रापर्यंत धान आणायचे.पुन्हा केंद्रावरून उचल करून घरापर्यंत नेण्यासाठी वाहतूक खर्च करायचा व वाळविल्यानंतर पुन्हा केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहतूक खर्च करायचा. एवढा खटाटोप करण्यास सांगितले जाते. कोंडीत पकडल्यानंतर शेतकरी हा उपद्व्याप टाळण्यासाठी ग्रेडरकडून होणाºया अन्यायाला बळी बळी पडत असल्याचे चित्र पाहयला मिळाले.कमाई कुणाच्या घशातशासकीय धान खरेदी केंद्रावर लाखों रुपयांच्या कमाईची उलाढाल या व्यवसायातून केली जाते. जे कर्मचारी सावळागोंधळ करतात ते बदनाम होतात मात्र ही कमाई संस्थाचालकांच्या घशात जात असल्याची ओरड आहे. संस्था ओलावा म्हणून शेतकऱ्यांकडून अधिक वजन घेतात व ओलाव्याची तूट म्हणून शासनाकडेही मागणी करतात असा आरोप बाजीराव तुळशीकर यांनी केला आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड