शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

दारू रिचवून गाडी चालवली, पोलिसांनी चांगलीच उतरवली !

By नरेश रहिले | Published: January 01, 2024 7:26 PM

थर्टीफर्स्टला कारवाई : १४ चालकांवर गुन्हा दाखल.

गोंदिया : मावळत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना धोकादायक स्थितीत वाहन चालविणाऱ्या सात चालकांवर ३१ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लोधीटोला येथील बसस्थानकावर आरोपी दुर्गेश पुरनलाल नेवारे (३३) रा. ठाणा याला टिप्पर धोकादायक स्थितीत चालविताना पोलिस हवालदार धर्मपाल भुरे यांंनी पकडले. गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या फुलचूरनाका येथे आरोपी संतोष मोतीलाल चुटे (५४) रा. राजगोपालघाट बजरंग नगर गोंदिया हा मद्याच्या धुंदीत मोटरसायकल चालविताना आढळल्याने पोलिस हवालदार धनराज बागडे यांनी त्याला पकडले.

शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जयस्तंभ चौकात विकास केवलचंद शरणागत (१९) रा. तुमखेडा हा धोकादायक स्थितीत मोटरसायकल चालवित असताना आढळला. पोलिस शिपाई राजेश बिसेन यांनी त्याला पकडले. गोरेगाव बसस्थानकावर पिकअप एमएच ०२ ईसी ००७५ या वाहनाला आरोपी राजेश गोपीचंद सोनटक्के (४५) रा. कमरगाव हा धोकादायक स्थितीत वाहन चालवित होता. सालेकसाच्या बसस्थानकावर आरोपी नंदकिशोर जयलाल नागपुरे (२८) रा. रोंढा, राजेश गेंदलाल चौधरी (२४) रा. गरूटोला मोटारसायकल हलगर्जीपणे चालविताना आढळले. नवेगावबांध पोलिसांनी शिवाजी चौक टी पाॅईंट येथे मुकेश सुरेश ठवरे (२६) रा. भिवखिडकी यांना पाेलिसांनी पकडले. मार्कंड मोरेश्वर हटवार (५१) रा. मुंगली, अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी संविधान चौकात मालवाहक विशाल हेमराज सोनवाने (२५) रा. तिडका यांनाही पोलिसांनी पकडले. त्या सर्व आरोपींवर संबंधित पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम २७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. देवरी पोलिसांनी तीन ऑटो चालकांसह पाच जणांची जिरवलीचिचगड टी पाॅईंट येथे छरमदास रामाजी अंबाडारे (४८) रा. धोबीसराड, दशरथ ललवा पांडे (४८) रा. बाह्मणी, अजय नामदेव मेंढे (२१) रा. सिंधीबिरी ता. देवरी, परसोडी येथील अजय बिरबल मरकाम (२९), शिल्पेश शरद शहारे (३४) रा. सौंदड आदी हलगर्जीपणे चालविताना आढळल्याने देवरी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया