शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

ठिकठिकाणी कारवाई करून पोलिसांनी पकडली दारू

By admin | Published: June 09, 2017 1:24 AM

जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई करून पोलिसांनी मोहफुलांची व देशी दारू जप्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई करून पोलिसांनी मोहफुलांची व देशी दारू जप्त केली.अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चापटी येथील रामकृष्ण चकटू पुराम (६२) याच्याकडून १० नग देशी दारूचे पव्वे, तिरोडा तालुक्याच्या जमनानगर येथील किरण देवा मालाधरे (२७) हिच्याकडून २० लिटर हातभट्टीची दारू, अंजोरा येथील शंकर दुलीचंद उईके (३५) याच्याकडून साखरीटोला येथे ८ नग देशी दारूचे पव्वे, मरामजोब येथील वीणा नारायण शहारे (४५) हिच्याकडून ९ देशी दारूचे पव्वे, घिवारी येथील सरोजपुरी पुरजपुरी वैकुंठी (४०) याच्याकडून ४ नग देशीे दारूचे पव्वे, आमगावच्या बेदाडी येथील रविंद्र शिवचरण कनोजे याच्याकडून ४३२ नग देशी दारूचे पव्वे (किंमत २१ हजार ६०० रुपये) पकडण्यात आला. लोधीटोला येथील सोनी महागू मेश्राम (६५) या महिलेकडून ११ नग देशी दारूचे पव्वे, मंदिटोला येथील रामू किशन पटले (४०) याच्याकडून ४ नग देशी दारूचे पव्वे, खाडीपार येथील परसराम चंद्रशेखर गुंडमवार (३५) याच्याकडून ४ नग देशी दारूचे पव्वे, सावंगी येथील श्रीराम नत्थू चाचेरे (४०) याच्याकडून ४ नग देशी दारूचे पव्वे, शिवणटोला येथील अनिता नारायण मदनकर (४५) हिच्याकडून ३ नग देशी दारूचे पव्वे, परसोडी येथील विजया श्रीनिवास मेरगुरवार (३८) हिच्याकडून चार नग देशी दारूचे पव्वे, खाडीपार येथील परसराम चंद्रशेखर गुंडमवार ४ नग देशी दारूचे पव्वे, छिपीया येथील मुकेश कमलदास उके (३२) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारू, मरारटोला-काटी येथील राजेश लालचंद कावरे (२४) याच्याकडून ७ लिटर हातभट्टीची दारू, रावणवाडी येथील कौशल गेंदलाल दमाहे (६२) याच्याकडून ४ नग देशी दारूचे पव्वे, जगनटोला येथील कल्पना अनिल रामटेके (४४) हिच्याकडून चार नग देशी दारूचे पव्वे, पलानगाव येथील दिलीप मुकाजी जनबंधू (४२) याच्याकडून १० नग देशी दारूचे पव्वे, गड्डाटोली येथील मीना दिलीप डोंगरे (३०) हिच्याकडून ५ नग देशी दारूचे पव्वे, रामनगर येथील अभिनय राजेंद्र नशिने (२९) याच्याकडून २२ नग देशी दारूचे पव्वे, आंबाटोली येथील बाबू नवशाद गफार शेख (३५) याच्याकडून १२ नग देशी दारूचे पव्वे, बडटोला येथील सुरेश शालीकराम मरस्कोल्हे याच्याकडून ५ लिटर मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली. सुकाटोला येथील ज्ञानीराम घुगन कटरे (६५) याच्याकडून ३० पव्वे, लोहारा येथील दिलीप भरतराम पंधरे (५०) याच्याकडून ४ नग देशी दारूचे पव्वे, गांगला येथील मुन्नालाल भरत कापसे याच्याकडून १५ लिटर हातभट्टीची दारू, सुकडी-डाक येथील फुलचंद जंगलू शेंडे (४५) याच्याकडून १२ लिटर हातभट्टीची दारू, गोंडीटोला येथील सुरेश उकेकडून ६० लिटर हातभट्टीची दारू, लोधीटोला येथील नरेंद्र शिवराम सव्वालाखे याच्याकडून १२ लिटर हातभट्टीची दारू, लेंडीटोला येथील अशोक अभिमन्यू उके (४०) याच्याकडून १५ लिटर हातभट्टीची दारू, गोंदिया शहराच्या झोपडी मोहल्यातील श्रावणदास माणिकपुरी (३९) कडून ८ लिटर, जोगलेकर वॉर्डातील किशोर मौजे (४१) याच्याकडून ९ लिटर, चुटीया येथील दुर्गाप्रसाद लांजेवार (३५) याच्याकडून ४ लिटर, मोहरामटोली येथील संतोष गोडबोले (४९) कडून ६ नग देशी दारूचे पव्वे, ईर्री येथील जितेंद्र भालाधरे (४०) ६ देशी दारूचे पव्वे, इटखेडा येथील रामकृष्ण घोरमोडे (५५) ३ लिटर हातभट्टीची दारू, ताडगावच्या राजीव नगरातील दशरथ शहारे (४५) याच्याकडून ५७ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले.