लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रामनगर व रावणवाडी येथील पोलीस ठाण्यांसाठी इमारत बांधकामासह येथील मनोहर चौकातील पोलीस लाईनच्या जागेवर १५० फ्लॅट्सचे बांधकाम लवकरच केले जाणार आहे. यासंदर्भात आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मंत्रालयात पोलीस मंहासंचालकांसोबत बैठक घेतली. त्यामुळे पोलीस कर्मचाºयांना आता निवासाची समस्या मार्गी लागणार आहे.पोलीस महासंचालक मिश्रा, पोलीस विभागाचे आर्कीटेक्ट संगी व संबंधीत अन्य अधिकाºयांची आमदार अग्रवाल यांनी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत आमदार अग्रवाल यांनी, रामनगर व रावणवाडी पोलीस ठाण्यांची स्थापना होऊन सात आठ वर्षांचा कालावधी झाला. मात्र अद्याप ते भाड्याच्या इमारतीत असल्याचे सांगीतले. तर शहरातील मनोहर चौकातील पोलीस लाईनमध्ये भरपूर जागा असूनही तेथे फक्त ३०-४० क्वार्टस आहेत. त्यांची स्थिती जर्जर झाली आहे. त्यामुळे या जागेवर योग्य नियोजन केल्यास १५० पेक्षा जास्त फ्लॅट्स तयार करता येतील. त्यामुळे पोलीस कर्मचाºयांना योग्य निवासाची सोय होईल. तसेच विभागाची कार्य क्षमताही वाढणार. रावणवाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी शासनाकडून जागा उपलब्ध झाली आहे. तर रामगनर पोलीस ठाण्यासाठी नगर परिषदेकडून नि:शुल्क जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगीतले. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्यासोबत दौरा करून त्यांना योजने संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी देखील याला सहमती दर्शविली आहे. आमदार अग्रवाल यांनी मांडलेल्या विषयांवर पोलीस महासंचालक मिश्रा यांनी संबंधीत अधिकाºयांकडून माहिती घेतली.आमदार अग्रवाल यांना लवकर या योजनांना मंजूरी देत पुढील दोन महिन्यांत कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले. एकीकडे बाई गंगाबाई रूग्णालयातील कर्मचाºयांसाठी कर्मचारी वसाहत तयार केली जात आहे. तेथेच आता पोलीस कर्मचाºयांच्या फ्लॅट्सचे काम होणार असल्याने त्यांनाही निवासाची योग्य व्यवस्था होणार असल्याचे आमदार अग्रवाल यांनी म्हटले आहे.
पोलीस कर्मचाºयांची बल्ले-बल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 9:06 PM
रामनगर व रावणवाडी येथील पोलीस ठाण्यांसाठी इमारत बांधकामासह येथील मनोहर चौकातील पोलीस लाईनच्या जागेवर १५० फ्लॅट्सचे बांधकाम लवकरच केले जाणार आहे.
ठळक मुद्देदीडशे फ्लॅट्सचे बांधकाम : आ.अग्रवाल यांची पोलीस महासंचालकांसह बैठक