३१ दारू विक्रेत्यांवर कारवाई : मोठ्या प्रमाणात दारू व मोहफुल जप्त गोंदिया : जिल्हाभरात अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. या अवैध दारूमुळे समाजस्वास्थ्य बिघडत असल्याची ओरड सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. या अवैध दारूच्या विरोधात मोहीम चालवून जिल्हा पोलिसांनी शनिवारी (दि.२१) धाडसत्र राबवून ३१ अवैध दारू विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली आहे. यामध्ये गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बैरागीटोला येथील मयाराम सखाराम इनवाते (५६) याच्याकडून सहा लीटर हातभट्टीची दारू, सहेसपूर येथील सरला रामेश्वर निटलये (४८) या महिलेकडून आठ लीटर हातभट्टीची दारू, उदेलाल चभार चौरागडे (६७) याच्याकडून तीन लीटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत कामठा येथे इंदिरा हिरालाल बागडे (४०, रा. कामठा) याच्याकडून देशी दारूचे आठ पव्वे, ढिमरटोली येथील श्रावण भिमा माने (४०) यांच्याकडून देशी दारूचे नऊ पव्वे, गर्रा येथील नरेंद्रकुमार कन्हैयालाल खांडवाये (३१) याच्याकडून पाच लीटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. केशोरी पोलिसांनी परसटोला येथील देवदास मोतीराम लांजेवार (३९) याच्याकडून देशी दारूचे ४८ पव्वे जप्त केले. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शिवप्रसाद ऊर्फ बर्डा मनिराम बिसोर (२७, रा. हिवरा) याच्याकडून २० लीटर देशी दारू, कुडवाच्या आंबेडकर चौकातील भोजराज वंजारी (२७) याच्याकडून देशी दारूचे सहा पव्वे, पंचशील चौक कटंगीकला येथील किशोर तुळशीराम डोंगरे (४५, रा.बरबसपुरा) याच्याकडून पाच लीटर हातभट्टीची दारू, मानिकराम धांडू शेंदरे (३४,रा. डोंगरगाव) याच्याकडून सहा लीटर हातभट्टीची दारू, खेमलाल छन्नू तुमसरे (४५) याच्याकडून तीन लीटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. दवनीवाडा पोलिसांनी बोंडरानी येथील चंद्रप्रभा हरिणा निके (४०) हिच्याकडून पाच लीटर हातभट्टीची दारू, महालगाव येथील नंदू दिगंबर नागपुरे (२१) याच्याकडून चार लीटर हातभट्टीची दारू, सविता राजकुमार मारबदे (२९) हिच्याकडून सात लीटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. नवेगावबांध पोलिसांनी आत्माराम रघु मेश्राम (६५, रा. भिवखिडकी) याच्याजवळून एक देशी दारूचा पव्वा जप्त केला. अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी बोंडगावदेवी येथील मीना जयदेव वांगणे (३५) हिच्याकडून देशी दारूचे सहा पव्वे, अफरोज गुलाब पठाण (२६, रा.महालगाव) याच्याकडून ६०० मिली देशी दारू जप्त केली.गोंदिया ग्रामीण पोलिसांनी पांढराबोडी येथील केशर मनोहर डहारे (४५) या महिलेकडून देशी दारूचे तीन पव्वे, चुटीया येथील मधुकर शेगू बोरकर (७२) याच्याकडून १० लीटर हातभट्टीची दारू जप्त केली. शहर पोलीस ठाण्यांतर्गत सुंदर नगरातील ज्योती संजय राऊत (४०) याच्याकडून पाच लीटर हातभट्टीची दारू, सिंगलटोली येथील राकेश ताराचंद गणवीर याच्याकडून पाच लीटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. तिरोडा पोलिसांनी संत रविदास वॉर्डातील श्यामराव श्रीराम झाडे (४०) याच्याकडून १२० किलो माहेफुल व दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण ४ हजार ५५० रूपयांचा माल, शबीरखान रहिम खान पठाण (४७) याच्याकडून १५ लीटर हातभट्टीची दारू, ६० किलो मोहफुल व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ३ हजार ७५० रूपयांचा माल, पूर्णा प्रल्हाद तांडेकर (४७) या महिलेकडून ३० किलो मोहफुल, २५ लीटर मोहफुलाची दारू व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ३४ हजार ४०० रूपयांचा माल, इंदिरानगर सुकडी येथील श्रीराम मन्साराम मारबते (५०) याच्याकडून चार लीटर मोहफुलाची दारू, मोरेश्वर ऊर्फ मोरबा मन्साराम मारबदे (५१, रा. इंदोरा) याच्याकडून २५ लीटर मोहफुलाची दारू, वडेगाव येथील रामकला रामदास कोटांगले (५५) या महिलेकडून १० लीटर हातभट्टीची दारू, विजय लेहनदास वंजारी (४०, रा. माळेगाव) याच्याकडून १२ लीटर मोहफुलाची दारू, मुंडीकोटा येथील मीना संजय खरात (४८, रा. मुंडीकोटा) याच्याकडून सात लीटर हातभट्टीची दारू, बकी येथील कृष्णा नारायण कोडगीलवार (३७) याच्याकडून देशी दारूचे सहा पव्वे जप्त करण्यात आले तर डुग्गीपार पोलिसांनी बोकाबोरी येथील कविता गुरूद्याल देशमुख (३१) या महिलेकडून देशी दारूचे चार पव्वे धाड घालून जप्त केले. सिध्दार्थ बाजीराव लांजेवार (३०, रा. पंचवटी) याच्याकडून देशी दारूचे पाच पव्वे जप्त करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी )
दारूविक्रेत्यांवर पोलिसांचे धाडसत्र
By admin | Published: November 23, 2015 1:34 AM