शहरं
Join us  
Trending Stories
1
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
2
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
3
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
4
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
5
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
6
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
7
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
8
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
9
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
10
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
11
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
13
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
14
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
15
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
16
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
17
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
18
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
19
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
20
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप

उन्हाच्या तीव्रतेने पोलीस भरतीत कसरत

By admin | Published: April 05, 2016 4:16 AM

जिल्हा पोलीस विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या शिपाई पदाच्या ४० जागांसाठी २९ मार्चपासून शारीरिक क्षमता चाचणी घेतली

गोंदिया : जिल्हा पोलीस विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या शिपाई पदाच्या ४० जागांसाठी २९ मार्चपासून शारीरिक क्षमता चाचणी घेतली जात आहे. उन्हाचा तडाखा वाढतच असल्यामुळे या चाचण्यांना सामोरे जाताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. दुसरीकडे उन्हाचा फटका बसू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून शक्य ती काळजी घेतली जात आहे.सध्या गोंदिया जिल्ह्याचा पारा ४२ अंशांवर चढला आहे. परंतु या उन्हाचे चटके उमेदवारांना फारसे जाणवणार नाही अशी व्यवस्था गोंदिया पोलीस विभागाने केली आहे. पहाटे ५ वाजतापासून तर सकाळी १० वाजतादरम्यान गोंदिया पोलीस विभाग शारीरिक चाचणी घेत आहे. उमेदवारांना थकवा जाणवू नये यासाठी शासनाने सशुल्क तत्वावर पाणी पाऊच, केळ, ग्लुकोजची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. परंतु गोंदिया पोलीस विभागाने यंदा तरूणांसाठी मोफत केळ, ग्लुकोज व पाण्याची सोय केली आहे. सोबतच दोन वैद्यकीय चमू ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे शारीरिक क्षमता चाचणी सकाळी १० च्या आत घेऊन उमेदवारांना घरी जाण्याची परवानगी दिली जात आहे. उर्वरित एक इव्हेंट करण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळीच ५ वाजता उभे राहण्याचा सल्ला देतात. यामुळे उमेदवारांना उन्हाची दाहकता जाणवत नाही. २९ मार्चपासून सुरू झालेली शारीरिक चाचणी ९ एप्रिलपर्यंत घेण्यात येणार असून उमेदवारांचा पाचवा इव्हेंट १६०० मीटर धावणे दुसऱ्या दिवशीे १० एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. शारीरिक क्षमता चाचणीचे गुण सोबतच त्याच दिवशी बोर्डवर व गोंदिया पोलीस विभागाच्या वेबसाईटवर टाकले जातात. याच महिन्यात महावीर जयंती, आंबेडकर जयंती व रामनवमी असे सन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त लागणार असल्याने या महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती जाणार असल्याचे सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)३२ कॅमेऱ्यांच्या नजरेत भरती४ पोलीस भरती पारदर्शकता ठेवण्यासाठी १६ सीसीटिव्ही तसेच १६ हॅडलींग व्हीडिओ कॅमेरे ठेवण्यात आले आहे. धावणे, गोळा फेक, लांब उडी, पूल अप्स व शंभर मीटर अशा चाचण्यांच्या ठिकाणी सिसीटीव्ही व हॅडलिंग कॅमेरे ठेवण्यात आले आहेत. ४भरती प्रक्रियेकरिता पोलीस अधीक्षक मिना, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, परि. सहायक पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, पोलीस उपअधिक्षक (गृह) सुरेश भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवीदास इलमकर, दीपाली खन्ना, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे तसेच जिल्ह्यातील पोलीस अधिकारी-कर्मचारी व लिपीकवर्गीय कर्मचारी कार्यरत आहेत.एका पदामागे १५ उमेदवार४शारीरिक चाचणी उतीर्ण झालेल्या सर्वच उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाणार नाही. तर एका पदामागे १५ उमेदवार घेण्यात येणार आहे. त्यामुळे ४० पदासाठी ६०० उमेदवारांना बोलावले जाणार असल्याचे अपेक्षित असले तरी एकाच सारखे गुण शेकडो मुलांनी घेतल्यामुळे टक्केवारी नुसार समान आकडा असलेल्या सर्व मुलांना लेखी परीक्षेसाठी त्या सर्वाना बोलावण्यात येणार आहे. त्यामुळे ८०० ते ९०० उमेदवारांना बोलावल्या जाण्याची शक्यात आहे. सर्वांना मोबाईल बंदी४गोंदिया पोलीस विभागात घेण्यात शिपाई पदाच्या भरतीत पारदर्शता ठेवण्यासाठी या पोलीस भरतीच्या कामात असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोबाईल आणण्यास बंदी करण्यात आली आहे. भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कुणीही मोबाईल आणणार नाही अशी ताकीद पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना यांनी दिल्याचे समजते.