शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

पोलीस यंत्रणेने योग्य समन्वयातून सुरक्षा बंदोबस्त करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 10:01 PM

येत्या २८ मे ला लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गोंदिया जिल्हा हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. या जिल्ह्याला मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याची तसेच शेजारी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची सीमा लागून आहे.

ठळक मुद्देअभिमन्यू काळे : आंतरराज्यीय सीमा परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येत्या २८ मे ला लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गोंदिया जिल्हा हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. या जिल्ह्याला मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याची तसेच शेजारी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची सीमा लागून आहे. दोन्ही राज्याच्या आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेचा भाग नक्षलदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे पोटनिवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार होणार नाही. यासाठी तिन्ही राज्याच्या सीमेलगतच्या पोलीस यंत्रणेने योग्य समन्वयातून सुरक्षा बंदोबस्त करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १८ मे ला लोकसभा पोटनिवडणुकीच्या दृष्टीने आयोजित आंतरराज्यीय सीमा परिषदेत सुरक्षेचा आढावा घेताना ते बोलत होते. या वेळी निवडणूक निरीक्षक एन.बी.उपाध्याय, शफुल हक, तेजप्रतापसिंग फुल्का, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, राजनांदगावचे पोलीस अधीक्षक वाय.पी.सिंग, बालाघाटचे पोलीस अधीक्षक अखिल पटेल, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिश धार्मिक, अपर पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, कोब्रा बटालियनेचे भाग्यश्री परमार, राजनांदगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीशंकर चंद्रा, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते (गोंदिया), मंदार जवळे (देवरी), राजीव नवले (आमगाव), नितीन यादव (तिरोडा), शैलेश काळे (कुरखेडा) यांची उपस्थिती होती. काळे म्हणाले, निवडणुकीच्या काळात आंतरराज्यीय सीमेवर कडक बंदोबस्त ठेवून जिल्ह्यात अवैध दारु, पैसा येणार नाही. यासाठी प्रत्येक वाहनाची कडक तपासणी करावी. तशीच तपासणी नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या नाक्यावर सुध्दा करावी. निवडणुकीच्या काळात संबंधित यंत्रणांनी सर्तक राहून काम करावे.जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागात ज्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी रस्ते नाही अशा ठिकाणी मतदान पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पायदळ जावे लागणार नाही. त्यासाठी बैलगाड्यांची व्यवस्था करावी असे त्यांनी सांगितले. डॉ. भुजबळ यांनी जिल्ह्यातील आंतरराज्यीय व जिल्ह्यातील विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.वाहनांची तपासणी करण्यात येत असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात मतदानाकरीता मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.११ कंपन्या व १५५८ पोलीस कर्मचारीनिवडणूक होत असलेल्या भागातील नक्षलदृष्ट्या संवेदनशील मतदान केंद्रे, भरारी पथके, प्रतिबंधात्मक कारवाई, जमा करण्यात आलेले परवाना शस्त्रे याबाबतची माहिती डॉ.भुजबळ यांनी दिली. जिल्ह्यात १२९० पोलीस बल उपलब्ध असून राज्य राखीव पोलीस दल किंवा केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११ कंपन्या १५५८ पोलीस अधिकारी-पोलीस कर्मचारी व होमगार्डची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.गडचिरोली परिक्षेत्रात या निवडणुकीच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली. उपस्थित निवडणूक निरीक्षकांना नक्षल चळवळीबाबत व त्यांच्या दलमबाबत जिल्ह्यात कोणते दलम कार्यरत आहेत. याबाबतची माहिती देखील त्यांनी दिली. निवडणूक निरीक्षकांनी पोटनिवडणुकी दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने नक्षलग्रस्त भागात मतदानाच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतली.

टॅग्स :Policeपोलिस