मिशन मोड अवैध दारूविक्रेत्यांचा कर्दनकाळतक्रार करण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक नरेश रहिले गोंदियाहातभट्टी, बनावटी दारू व एक्साईज ड्यूटी चुकवून दारूविक्री करणाऱ्यांचा कर्दनकाळ करण्याण्यासाठी गोंदिया पोलीस विभागाने अवैध दारूविक्री संदर्भात मीशन मोड या अभियानाची सुरूवात केली. या अभियानात अवैध दारूविक्रेत्यांच्याच मुसक्या आवळल्या जाणार नाही तर त्यांना सहकार्य करणाऱ्या पोलिसांनाही शिस्तभंगाच्या कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू सुरु नाही असे प्रमाणित करणारा प्रमाणपत्र ठाणेदारांना दर महिन्याच्या १० तारखेला द्यावा लागणार आहे. त्या प्रमाणपत्राला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमाणीत केल्यावर पोलीस अधिक्षकांना दिला जाणार आहे. अवैध दारूविक्री संदर्भात पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी कठोर भूमीका घेत दारूविक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याबरोबर त्यांना सहकार्य करणाऱ्या पोलीसाचीही गय न करण्याची भूमिका घेतली आहे. आमच्या बीटात किंवा ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री होत नाही असे प्रमाणपत्र बीट अमंलदाराला, ठाणेदाराला द्यावे लागणार आहे. ठाणेदाराने दिलेल्या प्रमाणपत्राला प्रमाणित करण्याचे काम उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे. परंतु त्यापूर्वी त्या ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूविक्री सुरू आहे किंवा नाही याची शहानिशा करूनच उपविभागीय अधिकारी ते प्रमाणपत्र (टेस्ट चेक) करून पोलीस अधिक्षकांना देतील. या पोलीस अधिक्षकांच्या उपक्रमामुळे दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. तर पोलिसांनी आपापल्या हद्दीतील दारूविक्रेत्यांना आता तुमची दुकाने बंद करा अन्यथा तुरूंगाची हवा खावी लागेल असा कडक फर्मान बीट अमंलदारांनी सोडला आहे. अवैध दारूविक्री ज्या गावात सुरू आहे त्याची माहिती जनतेने पोलिसांना द्यावी यासाठी व्हॉट्सअप क्रमांक देण्यात आला आहे. दारू गाळण्याऱ्याचे फोटो, ज्या दारू गाळण्याचे ठिकाण, एखाद्या कारखान्यात बनावटी दारू गाळण्यात येत असेल तर त्याचे छायाचित्र व माहिती व्हॉट्सअपवर पाठविल्यास कारवाई होणे अटळ आहे. यापूर्वी दारूविक्रेत्याला पकडून कारवाई करायचे. आता तसे चालणार नाही. दारूविक्रेत्यांबरोबर त्याचा मालक कोण? याचा तपास करून त्यालाही आरोपी केले जाणार आहे. तक्रारीवर ४८ तासांत कारवाईनागरिकांनी व्हॉट्सअप क्र.९१३००३०५४९ या क्रमांकावर तक्रार केल्यास प्रथम बीट अमंलदार कारवाई करेल, त्याने सोडल्यास त्या ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक कारवाई करतील. त्यांनीही न केल्यास ठाणेदार कारवाई करतील. त्यांनीही दुर्लक्ष केल्यास उपविभागीय अधिकारी कारवाई करतील. त्यांनीही दुर्लक्ष केले तर पोलीस अधिक्षकांच्या अधिनस्त असणारे पथक कारवाई करतील. थातूर-मातूर चौकशी होऊ नये यासाठी एका ठाण्याच्या हद्दीतील कारवाई दुसऱ्या ठाण्याचे कर्मचारी कारवाई करण्याची योजना पोलीस अधिक्षकांनी आखली. यातून निश्चीतच अवैध दारूविक्रेत्यांना चाप बसणार आहे. तक्रार कर्त्याने केलेल्या तक्रारींवर काय कारवाई झाली याची माहिती ४८ तासाच्या आत पोलीस अधिक्षकांना द्यावी लागणार आहे. व्यसनमुक्त चौथा जिल्हा?वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर नंतर आता गोंदिया हा राज्यातील चवथा व्यसनमुक्त जिल्हा होऊ पाहात आहे. त्यासाठी ग्रामीण भागात गावागावात महिला मंडळी दारूबंदीसाठी लोकचळवळ उभारत आहेत. आता पोलीस यंत्रणाही दारूविक्रेत्यांना तुरूंगात डांबण्याची सोय करीत असल्याने जिल्हा व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जिल्ह्यातील ३८८ गावांमध्ये दारूबंदी असल्याची माहिती पोलीस विभागाची आहे. एक वर्षाचा तुरूंगवासदारूविक्रेत्यांना अटक केल्यावर जामीनावर सोडून दिले जायचे. त्यानंतर त्यांना पीसीआर देण्याचे ठरले. काहींना तडीपार करण्यात आले. तरीही अवैध दारूचा महापूर वाहात असल्याने आता या अवैध दारूविक्रेत्यांवर महाराष्ट्र झोपडपट्टी धंदा अवैध हातभट्टीवाले व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार यांच्या कारवार्इंना प्रतिबंध करणारा कायदा १९८१ अन्वये अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. अवैध दारूविक्रेत्याला १ वर्ष स्थानबध्द (तुरूंगवास) करण्यात येणार आहे.
पोलिसांनाच द्यावा लागणार दारूबंदीचा दाखला
By admin | Published: October 06, 2016 12:57 AM