लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालीका शाळेतील स्वयंपाकीन महिला संघातर्फे स्वयंपाकीन महिलांना १० महिन्यांऐवजी ऐवजी १२ महिन्यांचे मानधन देण्यात यावे, या मागणीला घेऊन लक्षवेधी उपोषणाला १० फेब्रुवारीपासून सुरूवात करण्यात आली आहे. उपोषणाच्या अखेरच्या दिवशी गुरूवारी (दि.२०) त्यांनी रस्तारोको आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र ग्रामीण पोलिसांनी त्याचे रास्तारोको आंदोलन हाणून पाडले.जिल्हाभरातील स्वयंपाकीन महिला आंदोलन करण्यासाठी पुढे आल्या आहेत. शाळा व्यवस्थापन समित्या दोन महिलांना कामावर घेऊन एका स्वयंपाकी महिलेचे मानधन एक हजार रूपये वाटून देत आहेत. २०० ते २९९ विद्यार्थ्यांमागे तीन महिलांना प्रत्येकी एक-एक हजार रूपये घेण्यास बळजबरी करीत आहेत. सदर मानधन अत्यल्प असूनही स्वयंपाकीन महिला व पुरूषच शाळेमध्ये पाषण आहार शिजवून देण्याचे काम करीत आहेत. स्वयंपाकीन महिलांना सेवेतून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वयंपाकीन महिलांना शाळा व्यवस्थापन समिती इतर महिलांकडून पैसे वसूल करून त्यांना कामावर घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मानधनातून अर्धे मानधन दुसऱ्या महिलांना देण्याची हूकूमशाही शाळा व्यवस्थापन समित्या चालवित आहेत. अर्धे मानधन देत नसाल तर उद्यापासून येऊ नका अशा धमक्या दिल्या जात आहेत. शाळा व्यवस्थापन समित्यांनी शासनाच्या नियमाचा भंग केला आहे.अशात शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन व्हावे, स्वयंपाकीन महिलांना किमान वेतन लागू करण्यात यावे, त्यांना नियुक्त करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समित्यांना नसावा तो अधिकार शाळा व्यवस्थापन समित्यांकडून काढण्यात यावा या मागणीला घेऊन उपोषणाला सुरूवात करण्यात आली होती. आंदोलनाला ११ दिवस होऊनही मागण्या पूर्ण न होऊ शकल्यामुळे अखेर गुरूवारी (दि.२०) त्यांनी रस्तारोको आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. परंतु रस्ता रोको करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांचे आंदोलन हाणून पाडले.लक्षवेधी लावणार- आ. अग्रवालयावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन स्वयंपाकी महिलांचा हा मुद्दा शासन दरबारी मांडणार व त्यासाठी लक्षवेधी लावणार असल्याचे आश्वासन दिले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष चंदा दमाहे, कार्याध्यक्ष मनोज दमाहे, अनिता तांडेकर, दिलीप चुटे, प्रमीला राऊत, दिवाकर शेंडे, प्रतिभा बळगे, अरूणा तितिरमारे, भीमा वाघमारे, सरीता उके, अनुसया वंजारी, सुनिता पाऊलझगडे, गीता सोनवाने यांनी केले.
पोलिसांनी हाणून पाडला रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 6:00 AM
जिल्हाभरातील स्वयंपाकीन महिला आंदोलन करण्यासाठी पुढे आल्या आहेत. शाळा व्यवस्थापन समित्या दोन महिलांना कामावर घेऊन एका स्वयंपाकी महिलेचे मानधन एक हजार रूपये वाटून देत आहेत. २०० ते २९९ विद्यार्थ्यांमागे तीन महिलांना प्रत्येकी एक-एक हजार रूपये घेण्यास बळजबरी करीत आहेत. सदर मानधन अत्यल्प असूनही स्वयंपाकीन महिला व पुरूषच शाळेमध्ये पाषण आहार शिजवून देण्याचे काम करीत आहेत.
ठळक मुद्देस्वयंपाकीन महिलांचे आंदोलन : आंदोलनाची सांगता