आॅनलाईन लोकमतगोंदिया : यंदाच्या पहिल्या टप्प्यात रविवारी (दि.२८) जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील एक लाख ६ हजार ११४ बालकांना पोलीओ डोज दिला जाणार आहे. यात शहरी भागात २० हजार ६५५ तर ग्रामीण भागातील ८५ हजार ४५९ बालकांचा समावेश आहे.पोलीओचे समूळ उच्चाटण व्हावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सन १९८८ ला निर्णय घेतला आहे. १९९५ पासून पल्स पोलीओ लसीकरण मोहीम दरवर्षी राज्यात राबविण्यात येत आहे. यामुळे मागील काही वर्षात राज्यातील पोलीओ रूग्णांत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जगात सन २००८ मध्ये १६०६ रूग्णांची नोंद होती ती सन २०१७ मध्ये निरंक झाली आहे. महाराष्टÑात सन १९९८ मध्ये १२१ असलेली रूग्णसंख्या आता निरंक आहे. भारतात १३ जानेवारी २०११ नंतर एकही रूग्ण आढळलेला नाही.गोंदिया जिल्ह्यात पल्स पोलीओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी १०० बालकांमागे एक बूथ असे ९९५ बूथ तर १०० पेक्षा अधीक बालक असलेल्या ठिकाणांसाठी ३९० बूथ असे एकूण १३८५ बूथ ठेवण्यात आले आहेत. यातील ग्रामीण भागात १२५३ बूथ तर शहरी भागात ३२५ बूथ ठेवण्यात येणार आहेत.यासाठी ३ हजार ११८ कर्मचारी या पोलीओ लसीककरणाचे काम पाहणार आहेत. ग्रामीण भागात २ हजार ७९३ कर्मचारी तर शहरी भागात ३२५ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. २७८ पर्यवेक्षकांपैकी ग्रामीण भागात २५२ तर शहरी भागात २६ पर्यवेक्षक राहणार आहेत.शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी प्रत्येक गाव, टोले, वॉर्ड, शाळा, अंगणवाडी, बसस्थानक, रेल्वे स्थानकावर बुथ राहणार आहेत. ग्रामीण भागात तीन तर शहरी भागात पाच दिवस पोलीओ डोज दिला जाणार आहे. ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलीओ डोज पाजण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांनी कळविले आहे.तालुकानिहाय बूथ व बालकांची संख्यागोंदिया तालुक्यात २१८ बूथांवरून २१ हजार ९१२ बालकांना पोलीओ डोज दिला जाणार आहे. तिरोडा तालुक्यात १५६ बूथांवरून १० हजार ९६६ बालकांना पोलीओ डोज दिला जाणार आहे. गोरेगाव तालुक्यात १५३ बूथांवरून ९ हजार ३२९ बालकांना पोलीओ डोज दिला जाणार आहे. आमगाव तालुक्यात १०९ बूथांवरून ९ हजार ५१४ बालकांना पोलीओ डोज दिला जाणार आहे. सालेकसा तालुक्यात १२२ बूथांवरून ६ हजार ७११ बालकांना पोलीओ डोज दिला जाणार आहे. देवरी तालुक्यात १८२ बूथांवरून ८ हजार ४७७ बालकांना पोलीओ डोज दिला जाणार आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात १४२ बूथांवरून ८ हजार ३७९ बालकांना पोलीओ डोज दिला जाणार आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १७१ बूथांवरून १० हजार १७१ बालकांना पोलीओ डोज दिला जाणार आहे.
एक लाख बालकांना आज पोलिओ डोज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:45 PM
यंदाच्या पहिल्या टप्प्यात रविवारी (दि.२८) जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील एक लाख ६ हजार ११४ बालकांना पोलीओ डोज दिला जाणार आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यात १३८५ बूथ : ग्रामीण भागात तीन तर शहरी भागात पाच दिवस कार्यक्रम