लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पोलीओ रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिओ लसीकरण मोहीम १० मार्चला राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाच वर्षाखालील १ लाख ४ हजार ३८८ बालकांना पोलिओचा डोज देण्यात येणार आहे.मोहीमेच्या दिवशी बूथवर व त्यानंतर ग्रामीण भागात ३ दिवस व शहरी भागात ५ दिवस याप्रमाणे घरभेटीचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. ग्रामीण भागातील ८३ हजार ५७४ तर शहरी भागातील २० हजार ६३४ बालकांना पोलीओ डोज दिला जाणार आहे. यासाठी १ हजार ४०१ बूथ राहणार असून ग्रामीण भागात १ हजार २६८ तर शहरी भागात १३३ बूथ राहणार आहेत. यासाठी ३ हजार १८१ मनुष्यबळ लागणार आहे.ग्रामीण विभागात २ हजार ८५३ तर शहरी भागात ३२८ आहेत.२८२ पर्यवेक्षकांपैकी २५५ पर्यवेक्षक ग्रामीण भागात तर २७ पर्यवेक्षक शहरी भागात राहणार आहेत.जिल्ह्यातील २ लाख ९३ हजार ५७४ घरांना आरोग्य कर्मचारी भेटी देणार आहेत. पोलीओ डोजपासून एकही बालक सुटू नये यासाठी घरभेटी दिल्या जाणार आहेत. त्यात ग्रामीण भागातील २ लाख ५३ हजार ३५९ व शहरी भागातील ४१ हजार २१५ घरांना भेटी देण्यात येतील. या मोहीमेत एकूण ८४३ चमू काम करणार असून त्यापैकी ७७८ चमू ग्रामीण भागात तर ६५ चमू शहरी भागात काम करणार आहेत. टीम एक्स डे नुसार २ हजार ३९६ चमू काम करणार आहेत. त्यात ग्रामीण भागात २ हजार ९२ तर शहरी भागात ३०४ चमू राहणार आहेत.० ते ५ वर्षाखालील सर्व बालकांना पोलीओ डोज देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, मुकाअ डॉ. राजा दयानिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शाम निमगडे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी केले आहे.नकारार्थी क्षेत्रात भेटीजिल्ह्यातील सर्व पाडे, वस्त्या, वीटभट्टी, शेतात राहणारे मजूर, मुस्लीम वस्ती, मेंढपाळ, परप्रांतातून आलेली कुटुंबे, धाबे, शेतावरील घरे, बांधकामाची ठिकाणे, शहरालगतचा भाग, झोपडपट्या, पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरील घरे व ज्या ठिकाणी पोलीओ डोज पाजण्यासंदर्भात नकारात्मक भाव असेल अशा ठिकाणी लसीकरण करण्याच्या हेतूने भेटी देण्यात येणार आहे.५३ मोबाईल चमूज्या ठिकाणी तूरळक लाभार्थी आहेत त्या ठिकाणसाठी मोबाईल चमूचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ५३ मोबाईल चमू पोलिओ लसीकरणचे काम करणार आहेत. यातील ग्रामीण भागात ८४ तर शहरी भागात १८० चमू राहणार आहेत.
१ लाख ४ हजार बालकांना पोलिओचा डोज देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 12:59 AM
पोलीओ रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिओ लसीकरण मोहीम १० मार्चला राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाच वर्षाखालील १ लाख ४ हजार ३८८ बालकांना पोलिओचा डोज देण्यात येणार आहे.
ठळक मुद्देराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण : पाच वर्षातील सर्व बालकांना डोज द्या, तीन हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग