शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

शिवाजी महाराजांचा वारसा जपा

By admin | Published: February 21, 2017 12:58 AM

बलशाली मोगलांविरु द्ध लढा देणे त्याकाळी सोपे नव्हते. परंतु, एकट्याच्या बळावर विजय प्राप्त करता येणार नाही, ...

अभिमन्यू काळे : गोंदियात छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम थाटातगोंदिया : बलशाली मोगलांविरु द्ध लढा देणे त्याकाळी सोपे नव्हते. परंतु, एकट्याच्या बळावर विजय प्राप्त करता येणार नाही, ही बाब छत्रपती शिवाजी महाराज यांनी हेरून सर्व मावळ्यांना सोबतीला घेवून यश मिळविले. शिवाजी महाराज हे दुरगामी विचारवंत व रयतेचे राजा होते. त्यांनी कधीही कुणावरही अन्याय होवू दिला नाही. मात्र, दुर्देवाने शिवाजी महाराजांना दीर्घायुष्य लाभले नाही अन्यथा निश्चितच वैमानिकसारखी सेवासुद्धा त्या काळापासूनच पहावयास मिळाली असती. शिवाजी महाराज यांनी राज्य कसे चालवावे, याची शिकवणही त्या काळी दिली होती. त्याचप्रमाणे आज प्रगत शिक्षणाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा वारसा जपून ठेवणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व शिव छत्रपती मराठा समाजाच्या वतीने स्थानिक छत्रपती चौक येथे जयंती कार्यक्रम घेण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरु न ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने नगराध्यक्ष अशोक इंगळे, खा. नाना पटोले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सई काळे, माजी नगराध्यक्ष दामोदर अग्रवाल, पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला, मुरलीधर माहुरे, न.प. सभापती भावना कदम, माया सणस यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. अभिमन्यू काळे पुढे म्हणाले, जुन्या काळी इतिहास लिहिण्याची परंपरा होती. त्याच परंपरेत ब्रिटीश काळात शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिण्यात आला. शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील राजे होते. त्यांच्या सुशासनाचा प्रसार संपूर्ण जगात झाला होता. बलशाली साम्राज्य असलेल्या मोगलांना एक राजा म्हणून त्यांनी लढा देवून नाकीनऊ आणले. औरंगजेबसारख्या राजाला शिवाजी महाराजांमुळे अनेक वर्षे वणवण भटकावे लागले. शेवटी औरंगजेब यांनी मराठ्यांशी लढा देणे म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी चूक, असे कबूलही केले. त्यामुळेच शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे राजे ठरले. जर शिवाजी महाराजांनी एकट्याच्या बळावर लढाई करण्याचा विचार केला असता तर ते यशस्वी झाले नसते. साम्राज्य प्रस्थापित करायचे आहे, ते जनतेच्या सहकार्याशिवाय अशक्य आहे. हा विचार त्यांनी त्याकाळी पेरून किंबहुना अंमलात आणूण मोगलांपुढे त्यांनी आव्हान उभे केले होते. शिवाजी महाराज हे दुरगामी व रयतेचे राजे होते. ‘माझे राज्य मी चालविणार मात्र, त्यात कसलाही अडथळा येवू नये’ या विचारांचे ते होते. सुशासन कसे असते हे त्या काळात अनुभवात आले. त्यामुळे आजघडीला त्यांचा इतिहास वाचायला मिळत आहे. तेच सुशासन आजघडीला शासन-प्रशासनाच्या माध्यमातून चालविले जात आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे प्रत्येक नागरिकाचे विचार असायला हवे. अशा विचारांसाठी प्रगत शिक्षण घेणे काळाची गरज झाली आहे, असे मतसुद्धा त्यांनी व्यक्त केले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अशोक इंगळे, खा. नाना पटोले व इतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा उलगडा करीत मार्गदर्शन केले. जयंती कार्यक्र म थाटात व शिस्तबद्ध पार पडला. सुरु वातीला विद्यार्थिनींनी ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ असा संदेश देत नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे महिला-पुरु ष तसेच सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. संचालन सीमा बडे व श्रुती केकत यांनी केले. या वेळी आयोजक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक भुजबळ यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)