शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

पोस्टल कर्मचाऱ्यांनी नोंदविला काळ्या फिती लावून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 11:32 PM

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सांगली जिल्ह्यातील जत तसेच अलाहाबाद येथील प्रयागराज कचेरी मुख्य पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात ...

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरण : कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सांगली जिल्ह्यातील जत तसेच अलाहाबाद येथील प्रयागराज कचेरी मुख्य पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याच्या निषेधार्थ येथील मुख्य पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुरूवारी (दि.१) काळ्या फिती लावून घोषणा देत निषेध नोंदविला.गुरूवार व शुक्रवार (दि. २) असे दोन दिवस हे कर्मचारी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध नोंदवित आरोपींवर कारवाईची मागणी करणार आहे. सांगली जिल्ह्यातील जत येथील टपाल कार्यालयात बुधवारी तर अलाहाबादच्या प्रयागराज येथील मुख्य पोस्ट कार्यालयात शनिवारी कर्मचाऱ्यांना मारहाण तसेच कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.या घटनांची दखल घेत नॅशनल फेडरेशन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज युनियन ग्रुपी सी आणि डी यांच्यावतीने येथील मुख्य पोस्ट कार्यालयासमोर गुरूवारी काळ्या फिती लावून कर्मचाºयांनी निषेध नोंदविला. अशा घटना पुढे घडू नये यासाठी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली.देशव्यापी या आंदोलनांतर्गत येथील मुख्य कार्यालयातील सुमारे १०० तर जिल्ह्यातील ११ टपाल कार्यालयातील सुमारे ३०० कर्मचारी यात सहभागी आहेत.काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी (दि.२) हे कर्मचारी पुन्हा एकत्र येणार असून गेट मिटींगमधून घटनेचा निषेध नोंदविणार आहेत. तसेच त्यानंतरही आरोपींवर कारवाई न झाल्यास अनिश्चीतकालीन देशव्यापी कामबंद आंदोलन केले जाणार असल्याचे संघटनेचे सचिव सहदेव सातपुते, पोस्टमास्तर एच.आर.लांजेवार, सहसचिव प्रवीण शुक्ला, पराग बडोले, नितीन चव्हाण, पवन वाठोरे, योगेश कटरे, भागचंद शेंडे यांनी सांगीतले.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस