लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणून योग्य व पात्र लाभार्थ्याला स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरित करण्यासाठी पॉस मशीनचा वापर करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ९९८ स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना पॉस मशिनच्या आधारे धान्य वितरित करण्यात येत आहे.जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणाच्या अंतिम टप्प्यात शिधा पत्रिकांचे आधार कार्ड लिंक करण्याचे काम सुरु आहे. यापुढे ही प्रणाली आधार क्रमांकावर आधारित राहणार आहे. त्यामुळे शिधापित्रकेतील प्रत्येक सदस्याचा आधार क्र मांक असणे अनिवार्य आहे. आधार क्रमांक नसेल अशा शिधा पत्रिकाधारकाला अथवा कुटूंबातील सदस्याला धान्य मिळणार नाही. प्रत्येक स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वितरण हे पॉस (पॉर्इंट आॅफ सेल) मशीनद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेत पारदर्शकता राहणार आहे. स्वस्त धान्य दुकानातून, दुकानात गेल्यावर शिधा पत्रिकाधारकाने त्याच्या नावासमोर अथवा कुटूंबातील जी व्यक्ती धान्य घेण्यास गेली असेल त्या व्यक्तीच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाचा वापर करावा. जेणेकरून आधार क्रमांक जुळत असल्याची खात्री होईल. शिधा पत्रिकाधारकाने रास्तभाव दुकानात गेल्यानंतर त्याचा अंगठा-बोट स्वच्छ आहे याची खात्री करावी. त्यानंतरच मशीनवर बोट लावावे. त्यामुळे नावाची ओळख पटू शकेल. ज्यांच्या नावाची शिधा पत्रिका आहे त्याच व्यक्तीने अथवा त्याच्या कुटूंबातील सदस्याने स्वस्तधान्य दुकानात धान्य घेण्यास जावे. इतर कुणासही पाठवू नये. रास्तभाव दुकानातून धान्याचे वितरण केवळ पॉस मशीनद्वारेच होणार असल्याची नोंद सर्व शिधा पत्रिकाधारकांनी घ्यावी. ज्यांनी अद्याप आधार क्र मांक जमा केले नसतील त्यांनी त्वरित आपले आधार क्रमांक स्वस्तधान्य दुकानदाराकडे जमा करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सवई यांनी केले आहे.जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील ज्या शिधा पत्रिकाधारकांनी अद्याप देखील आधार क्र मांक दिले नसतील त्यांनी त्वरित संबंवित तालुक्यातील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात किंवा गावातील स्वस्तधान्य दुकानदाराकडे जमा करावे.-अनिल सवई,जिल्हा पुरवठा अधिकारी
स्वस्तधान्य दुकानातून पॉसद्वारे धान्य वितरणास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 11:16 PM
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणून योग्य व पात्र लाभार्थ्याला स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरित करण्यासाठी पॉस मशीनचा वापर करण्यात येत आहे.
ठळक मुद्दे९९८ स्वस्त धान्य दुकान : आधार क्र मांक असेल तरच मिळेल धान्य