परिवर्तन पॅनल विजयी : चुरशीच्या लढतीत संघर्ष एकता पराभूत चिचगड : रविवारी ५ मार्चला आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था चिचगडची निवडणूक पार पडली. यात परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळविला. मागील १० वर्षांपासून सत्तेत असलेली शेतकरी संघर्ष एकता पॅनल चिचगड तसेच जि.प.सदस्य अलताफ हमीद व अन्य यांची नवीन परिवर्तन पॅनल यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यात परिवर्तन पॅनलच्या १२ उमेदवारांपैकी बाराही उमेदवार निवडून आले. परिवर्तन पॅनलच्या विजयामुळे चिचगड परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत. परिवर्तन पॅनलच्या नवनिर्वाचित उमेदवारांमध्ये आदिवासी कर्जदार गटामधून सुदाम भोयर, काशीराम भलावी, पंचुलाल राऊत, बकाराम भोगारे, संताराम भोयर, राजेंद्र कोल्हारे, महिला गटामधून निता बालाराम कुंजाम, कुसमा कोल्हारे, ओबीसी गटामधून संदीप कटकवार, भुवन नरवरे, एससी तथा एनटी गटामधून नृपराज तिरगम, ओबीसी गैरकर्जदार गटामधून गणेश देशमुख, एस.टी. गटामधून बळीराम धानगुण यांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी आ. संजय पुराम, माजी आ. रामरतनबापू राऊत, जि.प. सदस्य अलताफ हमीद, प्रभाकर कोल्हारे, घासीलाल कटकवार, बालाराम कुंजाम आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)
१० वर्षांची सत्ता उलटली
By admin | Published: March 08, 2017 1:10 AM