लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त वतीने १६ जून रोजी सकाळी ११ वाजता जैन कुशल भवन गोंदिया येथे उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्र गोंदियाच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा व प्रधानमंत्री मुद्रा योजना, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उदघाटन राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल करतील. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे राहतील. अतिथी म्हणून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भूजबळ, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, नगराध्यक्ष अशोक इंगळे, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर उपस्थित राहणार आहेत. यावेळी मार्गदर्शक म्हणून जिल्हा अग्रणी व्यवस्थापक अनिलकुमार श्रीवास्तव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक मदन खडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, बँक इंडियाच्या स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापक आनंद वासनिक, गटविकास अधिकारी एस.व्ही. इस्कापे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी निलेश भुते, कनिष्ठ कौशल्य व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी सुरेश गणराज व सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर उपस्थित राहणार आहेत.गोंदिया तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी करणारे महिला बचतगट, उत्कृष्ट ग्रामसंस्था, उत्कृष्ट पशुसखी, जास्त कर्ज घेणारे गट यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचे कर्ज प्रकरणाचे मंजुरीपत्र संबंधित लाभार्थी महिलांना देण्यात येणार आहे. बचत गटातील महिलांना व गरजू व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यात उपस्थित राहण्याचे आवाहन सुनील सोसे व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले आहे.
आज प्रधानमंत्री मुद्रा योजना मेळावा
By admin | Published: June 16, 2017 1:11 AM