लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : वर्षभरापूर्वीपासून भंडारा-पवनी महामार्गाच्या रुंदीकरण बांधकाम सुरू आहे. पावसाच्या पाण्यामुळे नेरला ते अड्याळ या रस्त्यावर निकृष्ठ बांधकामामुळे येणाऱ्या जाणाऱ्याजनतेस त्रास सहन करावा लागतो. या महामार्गावरून ये जा करताना अनेक किरकोळ अपघात दररोज घडतात. संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तरी कुणीही लक्ष न दिल्याने १६ ऑगस्टला प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत नेरलात आंदोलन केले.या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग दुरुस्तीचे काम सुरू केल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, अशी ताठर भूमिका पवनी तालुकातील अड्याळ, नेरला येथील नागरिकांसह पहारच्या कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर अधिकारी, कंत्राटदार, यांच्यासह पोलीसांचा ताफा आंदोलनस्थळी पोहचले. त्यांनी महामार्ग दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ केला. लवकरच एकेरी वाहतूक सुरु करण्याचे आश्वासन दिले. आंदोलनाचे नेतृत्व प्रहारचे जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी यांनी केले. याप्रसंगी मंगेश वंजारी, दीपक पाल, विनोद वंजारी, अतुल राघोर्ते, विवेक माथूरकर, अक्षय तलमले, जितू मेश्राम, संदीप निबार्ते. विवेक विक्की खोटेले तालुका प्रमुख लाखनी, जितेंद्र भुरे, तालुका सचिव लाखनी, आशिष सहारे, स्वप्नील रणदिवे, अक्षय उके, राहुल रोहकर, शुभम शेंडे, प्रणय दिघोरे, सचिन लोहारे, राहुल नारनवरे, सुबोध मोटघरे, विशाल आरीकर, सचिन रणदिवे, मंगेश लुचे, प्रवीण लोहारे, शुभम लोहारे, वैभव मेश्राम, नंदू शहारे, राकेश अरीकर, निशांत रामटेके आदी उपस्थित होते.
महामार्गाच्या दूरवस्थेसंदर्भात प्रहार रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 5:00 AM
रस्त्यावर निकृष्ठ बांधकामामुळे येणाऱ्या जाणाऱ्याजनतेस त्रास सहन करावा लागतो. या महामार्गावरून ये जा करताना अनेक किरकोळ अपघात दररोज घडतात. संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तरी कुणीही लक्ष न दिल्याने १६ ऑगस्टला प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत नेरलात आंदोलन केले.
ठळक मुद्देभंडारा-पवनी महामार्ग : अधिकारी, कंत्राटदारांनी दिले आश्वासन, बांधकामाला प्रारंभ