शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

प्रतापगडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:22 AM

प्रतापगड येथे बिबट्याचा धुमाकूळ असल्याने गावात दहशत पसरली आहे. वनविभागातर्फे गावात प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पत्रक व ग्रामसभा घेऊन खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बिबट्याचा धुमाकूळ थांबविण्यासाठी गावकरी वनविभागाकडे तक्रार करीत आहेत.

ठळक मुद्देगावात दहशत : प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : प्रतापगड येथे बिबट्याचा धुमाकूळ असल्याने गावात दहशत पसरली आहे. वनविभागातर्फे गावात प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पत्रक व ग्रामसभा घेऊन खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बिबट्याचा धुमाकूळ थांबविण्यासाठी गावकरी वनविभागाकडे तक्रार करीत आहेत.प्रतापगड या गावाला लागून पहाड व जंगल आहे. जंगलाला लागूनच गावच्या मध्यभागी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा व अंगणवाडी आहे. सुमारे दोन महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरु आहे. १ आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास शालेय परिसरात बिबट आढळून आला होता. यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवीताला धोका संभवतो. शालेय प्रशासनाने याची उपवनसंरक्षकांकडे तक्रार करुन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.गोठणगावच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी लगेच या पत्राची दखल घेऊन उपवनसंरक्षकांना मार्गदर्शन मागविले आहे. हा बिबट साधारणपणे अंधार पडल्यानंतर गावात येतो. कोंबड्या, कुत्रे, कबूतर यावर ताव मारुन आपली भूक भागवितो. त्याने गावातीलच एका मुलीवर झेप घेतली. मात्र त्यातून ती बचावली अशाही चर्चा आहेत. बिबटच्या या वावरामुळे गावकºयांनी जंगलाच्या दिशेने जाणे टाळले आहे. बिबटच्या अधिवास तपासणीसाठी वनविभागातर्फे गावात मुख्य ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत. पिंजरे सुद्धा आणून ठेवले आहेत. गाव व जंगल परिसरात कार्यरत बिट वनरक्षकाची आळीपाळीने गस्त केली जात आहे. गस्त करीत असतांना उपाययोजना म्हणून फटाके फोडून आवाज केला जात आहे. आदि उपाययोजना वनविभाग काटेकोरपणे करीत आहे. एकापेक्षा अधिक बिबट असण्याची शक्यता गावकºयांनी व्यक्त केली आहे. उपवनसंरक्षक यावर काय निर्णय घेतात याकडे गावकºयांचे लक्ष लागले आहे.गोठणगावात कोंबड्या केल्या फस्तबिबट्याने सोमवारी (दि.६) सदाराम औराशे यांच्या बकºया खाऊन फक्त केल्या. तर मुकुंदा जमदाळ, गोविंदा कलाम, रमेश हटवार आणि राजेंद्र वालदे यांच्या घरातील कोंबड्याही बिबट्याने खाऊन फस्त केल्या आहेत. बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिक दशहतीत असून रात्रीला घराबाहेर निघणे कठिण झाले आहे. तरी वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. एवढेच नाही तर एकट्या लाल तोंड्या बंदराचा उपद्रव गावात वाढला आहे. बंदर घरावरचे कवेलू काढून घरातील भात-भाजी, तांदुळ-गहू भाजीपाला खात अहे. ग्यानीराम काळसर्पे व प्रकाश राऊत यांच्या घरावरील कवेलू काढून भात-भाजी खाऊन फस्त केले. बंदरामुळे उपाशी राहण्याची पाळी नागरिकांवर आली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग