लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात सोडा, डॉक्टरांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कोविड-१९ ची धास्ती घेऊन सरकारी किंवा खासगी रूग्णालयात रूग्णांना दाखल करून घेत नसल्यामुळे एका गर्भवती महिलेची प्रसूतीसाठी तब्बल रात्रभर फरफट झाली. प्रसूतीच्या वेदनेने कन्हवत असलेल्या त्या गर्भवतीला गोंदिया शहरातील आठ खासगी डॉक्टरांचे दार ठोठावले.मात्र तिची प्रसूती करण्यास नकार देण्यात आला. शासकीय रूग्णालयातूनही एकदा परत पाठविण्यात आले. परंतु मोठ्या व्यक्तींचा फोन जाताच सकाळीच सुखरूप प्रसूती करण्यात आली.तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील मांग गारूडी समाजाचे लोक कुडवा येथे राहून आपला उदरनिर्वाह करतात. केरकचरा वेचून किंवा भीक मागून पोट भरणाऱ्या या गोरगरीबांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुडवा येथील गर्भवती महिला मोनिका करीम शेंडे यांना २५ ऑगस्टच्या रात्री प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यावर त्यांनी शासकीय रूग्णालय गाठले. परंतु त्या महिलेची कोविड तपासणी झाली नसल्याने तपासणी केल्याशिवाय तिला गंगाबाई स्त्री रूग्णालयात दाखल करणार नाही अशी भूमिका तेथील डॉक्टरांनी घेतली. आधी कोविड चाचणी करा मगच आत घेऊ अशी भूमिका घेतल्यामुळे त्या गर्भवतीला प्रसूतीच्या वेदना सुरू असताना परत कुडवा येथे नेण्यात आले. परंतु सामजिक कार्यकर्ता प्रशांत बोरसे यांनी याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांना दिली.चौबे यांनी गंगाबाई स्त्री रूग्णालयातील प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ.देशमुख यांना माहिती दिल्यावर आज (दि.२६) सकाळी त्या महिलेला गंगबाई स्त्री रूग्णालयात बोलावून तिची सामान्य प्रसूती करण्यात आली.गर्भवतींची कोविड चाचणी कोण करणार?शासनाने प्रत्येक गर्भवतीची कोविड चाचणी मोफत करायची म्हणून प्रत्येक आरोग्य संस्थेला रॅपिड अन्टीजन किट पुरविले आहे. परंतु गर्भवतींची रॅपिड अन्टीजन चाचणी झाली नाही. परिणामी मोनिकाची प्रसूती करण्यास खासगी डॉक्टरांनी नकार दिला. सरकारी रूग्णालयातही हीच परिस्थिती आहे.दबाव पडल्याशिवाय उपचार होत नाहीतगोंदिया जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असो किंवा बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात असो गोरगरीबांची उपचारासाठी ससेहोलपट होते. राजकारणी, मोठे अधिकारी किंवा पत्रकारांचे फोन गेल्याशिवाय येथील रूग्णांचे उपचारच होत नसल्याच्या तक्रारी नेहमी गोगरीब करतात. परंतु त्या रूग्णांना सात्वंना देऊन सरकारी रूग्णालयाची प्रतिमा चांगली मांडण्याचा प्रयत्न हे घटक करीत असले तरी सुध्दा या शासकीय रूग्णालयात मोठ्या व्यक्तींचे फोन गेल्याशिवाय उपचार होत नसल्याची विदारक स्थिती आहे.
उपचारासाठी गर्भवतीची फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 5:00 AM
कुडवा येथील गर्भवती महिला मोनिका करीम शेंडे यांना २५ ऑगस्टच्या रात्री प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यावर त्यांनी शासकीय रूग्णालय गाठले. परंतु त्या महिलेची कोविड तपासणी झाली नसल्याने तपासणी केल्याशिवाय तिला गंगाबाई स्त्री रूग्णालयात दाखल करणार नाही अशी भूमिका तेथील डॉक्टरांनी घेतली. आधी कोविड चाचणी करा मगच आत घेऊ अशी भूमिका घेतल्यामुळे त्या गर्भवतीला प्रसूतीच्या वेदना सुरू असताना परत कुडवा येथे नेण्यात आले.
ठळक मुद्देखासगीत प्रवेश नाही : सरकारी रुग्णालयांनी नाकारले