शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

ग्राम विकासाचे आराखडे तयार करा

By admin | Published: February 15, 2017 2:01 AM

ग्रामीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. जिल्ह्याचा मानवी विकास निर्देशांक वाढविण्यासाठी शिक्षण,

राजकुमार बडोले : कटंगी येथील जिल्हास्तरीय सरपंच मेळावा गोंदिया : ग्रामीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. जिल्ह्याचा मानवी विकास निर्देशांक वाढविण्यासाठी शिक्षण, आरोग्य व रोजगाराकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्राम विकासाची जास्तीतजास्त कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीनी ग्राम विकासाचे आराखडे तयार करावेत, असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. सोमवारी (दि.१३) जवळील ग्रामकटंगीकला येथे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय सरपंच मेळाव्याच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय पुराम, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी.कटरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, समाज कल्याण समिती सभापती देवराज वडगाये, सालेकसा पंचायत समिती सभापती हिरालाल फाफनवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, लता दोनोडे, दुर्गा तिराले, कटंगीकलाच्या सरपंच कांता नागरीकर उपस्थित होत्या. पुढे बोलताना बडोले यांनी, जिल्हा लवकरच हागणदारीमुक्त घोषित होणार आहे. यासाठी सरपंच व सचिव तसेच ग्रामस्थांनी जो पुढाकार घेतला यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत. गावे स्वच्छ झाली तर देश स्वच्छ होईल. शौचास उघड्यावर बसण्याची मनोवृत्ती बदलणे गरजेचे आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींनी चौकाचौकात कचराकुंड्या बसवाव्या. जिल्हा डास व शौचमुक्त झाला तर संपूर्ण जिल्हा रोगराईमुक्त होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करु न देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून त्यांनी, इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. इंटरनेटवर अनेक ठिकाणी रोजगार व नोकरीच्या संधी असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील सर्वच शाळा डिजीटल झाल्यास विविध प्रकारचे शिक्षण मिळण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेंढे यांनी, सरपंच आणि सचिवांचे नाते दिवा आणि वातीसारखे आहे. कोणतेही उलटसुलट काम होणार नाही याची काळजी घ्यावी. गावाच्या विकासासाठी मिळणारा निधी योग्य वेळेत व योग्यप्रकारे पारदर्शकतेने खर्च करावा. सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री असतो. गावातील अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो. एका सचिवाकडे तीन ते चार ग्रामपंचायतींची जबाबदारी असल्यामुळे ही जबाबदारी योग्य समन्वयातून पार पाडावी. चौदाव्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीचा ग्रामपंचायतीने योग्यप्रकारे खर्च करावा. गावातील आंगणवाडी व शाळा दुरुस्ती तसेच पाण्याची व्यवस्था याकडे लक्ष द्यावे असे त्या म्हणाल्या. आमदार पुराम यांनी सरपंच व सचिव हे गावाच्या विकासाची मुख्य चाके असून सरपंचांना विकासाच्या बाबतीत प्रशिक्षण मिळाले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. गहाणे यांनी, चौदाव्या वित्त आयोगाचा निधी कसा खर्च करावा याचे नियोजन प्रत्येक ग्रामपंचायतीने काळजीपूर्वक करावे. राज्यघटनेतून जे अधिकार मिळाले आहेत त्याचा योग्यप्रकारे गावाच्या विकासासाठी वापर करावा. ग्रामपंचायतचे प्रमुख म्हणून सरपंचानी काम करीत असतांना गावातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे असे त्या म्हणाल्या. प्रास्ताविकातून डॉ.पुलकुंडवार यांनी, लवकरच जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यात येणार आहे. २०११ च्या बेसलाईन सर्वेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून ३५ हजारांपेक्षा जास्त शौचालय जिल्ह्यात बांधण्यात आली आहे. वाढीव कुटुंबांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शौचालय बांधून देण्यात येणार आहे. नादुरु स्त शौचालयांच्या दुरु स्तीसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. उघड्यावर शौचास जाण्याची वृत्ती बंद केली पाहिजे. आता उघड्यावर बसणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल. जिल्हा हागणदारीमुक्त झाल्यानंतर निरंतर स्वच्छतेचे निकष पाळावे लागणार आहे. ग्रामगितेच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेले विचार प्रत्यक्षात अंमलात आणावे असे मत मांडले. शिक्षण, आरोग्य, पोषण व निवारा यासुध्दा जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहे. शिक्षक लोकप्रतिनिधी आणि पालकांनी बालकांच्या शिक्षणाप्रती जागृत राहणे आपले कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले. संपूर्ण स्वच्छता व गावाचा विकास यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, चौदावा वित्त आयोग-निधी खर्च यावर गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील सरपंच, सचिव, ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, गटविकास अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संचालन विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे व जी.टी.सिंगनजुडे यांनी केले. आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी) ग्रामसेवकांनी केला काळ््या फिती लावून निषेध या सरपंच मेळाव्यात ग्रामसेवकांनी उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेश बागडे, देवरी येथील पंचायत समिती विस्तार अधिकारी एम.एस.खुणे व सालेकसा येथील विस्तार अधिकारी यु.टी.राठोड यांच्या अरेरावीपणाचा निषेध नोंदविण्यासाठी काळ््या फिती लावून उपस्थिती दर्शविली. विस्तार अधिकारी राठोड हे गेल्या १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून सालेकसा येथे एकाच ठिकाणी कार्यरत कसे? याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.