लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यापूर्वी आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. एखाद्यावेळी अयशस्वी झाल्यामुळे खचून न जाता वा आपल्या नशिबाला दोष न देता आपण ठरविलेले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करावा. वेळेचा सदुपयोग करु न घ्यावा. परीक्षेची तयारी करताना परावृत्त करणारे अनेक लोक आपल्याला भेटतात, त्यामुळे अशावेळी अभ्यासापासून परावृत्त न होता, तसेच सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मिडियात भरकटून न जाता आपण ठरविलेल्या ध्येयानुसार तयारी करावी, असे प्रतिपादन पोलीस उप अधीक्षक रमेश बरकते यांनी केले.जिल्हा प्रशासनाच्यावतीने नाविण्यपूर्ण उपक्र म ‘शोध क्षमतेचा, ग्रामीण ऊर्जेचा’ स्पर्धा परीक्षा व्याख्यानमालेंतर्गत शुक्रवारी (दि.२१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजीक न्याय भवन येथे आयोजीत पाचव्या सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रेल्वे विभागाचे सहायक विभागीय अभियंता अनूज कुल्हारी, मुकेश जांगिड, मोटार वाहन सहायक निरीक्षक विरसेन ढवळे, उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य देवसुदन धारगावे उपस्थित होते.पुढे बोलताना त्यांनी, इयत्ता १२ वी, डी.एड.अभ्यासक्र म, सहायक शिक्षकाची नोकरी, नंतर पोलीस उपनिरीक्षक, विक्र ीकर निरीक्षक ते पोलीस उपअधीक्षक पदापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा गेला. तसेच सदर नोकऱ्या मिळविण्याकरीता त्यांना किती परिश्रम घ्यावे लागले याबाबत त्यांच्या जीवनातील अनुभव व प्रवास त्यांनी सांगितला. तसेच हरिवंशराय बच्चन यांच्या प्रसिध्द कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करीत वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणेबाबत तसेच व्यसनापासून दूर राहण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचित केले.कुल्हारी यांनी, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाºया स्पर्धा परीक्षांबाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षांचे पेपर सोडविण्याबाबत विद्यार्थ्यांना महत्वाच्या टिप्स दिल्या. ढवळे यांनी, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यापूर्वी संबंधित परीक्षेचा अभ्यासक्र म, प्रश्नांचे स्वरु प, त्याकरीता आवश्यक संदर्भीय-क्रमिक पुस्तकांचे अवलोकन-वाचन करणे आवश्यक असल्याचे. तसेच चालू घडामोडींबाबत दैनिक वर्तमानपत्रे, मासिके व परीक्षांच्या सराव प्रश्निपत्रकांचा वापर करण्याबाबत सांगीतले.जांगिड यांनी, विद्यार्थ्यांनी आपापर्संत आंतरिक स्पर्धा करु न यश संपादन करण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थी कशाप्रकारे परीक्षेची तयारी करतात त्यावर त्यांचे यश अवलंबून असते. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना स्वत:चे लघु टाचन तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांचे उत्तमरित्या आकलन करणे सोईचे होते असे सांगितले. प्रास्ताविक मांडून आभार समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ.मंगेश वानखेडे यांनी मानले.
सोशल मीडियात भरकटून न जाता तयारी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 8:16 PM
कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यापूर्वी आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. एखाद्यावेळी अयशस्वी झाल्यामुळे खचून न जाता वा आपल्या नशिबाला दोष न देता आपण ठरविलेले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करावा. वेळेचा सदुपयोग करु न घ्यावा.
ठळक मुद्देरमेश बरकते : स्पर्धा परीक्षा व्याख्यानमालेचे पाचवे सत्र उत्साहात