लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत संपूर्ण देशभरात मंगळवारपासून (दि.२७) गोवर-रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासन देखील गोवर-रुबेला लसीकरणासाठी सज्ज झाले असून याची पूर्वतयारी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. फुलचंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात नुकतीच पूर्वतयारी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती.मार्गदर्शक म्हणून डीएचओ डॉ. वेदप्रकाश चौरागडे, गंगाबाईचे अधिक्षक डॉ. सायस केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयातर्फे समन्वयक डॉ. गौरव बग्गा, लसीकरण प्रभारी बालरोग तज्ञ डॉ. सागर सोनारे, गोवर-रुबेला लसीकरण माहिती व प्रचार समन्वयक डॉ. सुवर्णा हुबेकर, मेट्रन दिप्तीशिखा साळवे, लसीकरण परिचारिका प्रभारी इंगळे, अधिपरिचारिका प्रियंका डोंगरे आदी उपस्थित होते.शहरातील बालकांसाठी मंगळवारपासून (दि.२७) बाई गंगाबाई महिला रुग्णालयात गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेची सुरुवात होणार असून नि:शुल्क लसीकरण सेवा दिली जाणार आहे. त्याकरीता ९ महिने ते १४ वर्षाच्या बालकांचे लसीकरण केले जाणार आहे.संपूर्ण शहरातील बालकांसाठी पुरेल एवढा लसींचा साठा स्पेशल वॅनद्वारे कोल्डचेनमध्ये रविवारी (दि.२५) बाई गंगाबाई रूग्णालयाला प्राप्त झाला आहे. लसीकरण विभाग गोवर-रुबेला अभियान यशस्वी करण्यासाठी सुसज्ज झाले आहे.बाह्यरुग्ण विभागात स्पेशल गोवर-रुबेला लसीकरण बूथची निर्मिती करण्यात आली आहे. जर एखाद्या बालकाला काही त्रास झाला तर त्यासाठी बाह्यरुग्ण विभागातच इमरजंसी कीट सहीत रिकव्हरी रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेसाठी बाई गंगाबाई महिला बाल रुग्णालय सज्ज झाले आहे.अधिपरिचारिका प्रियंका डोंगरे, जिजा अहीर, रुपाली टोंगे, एएनएम केवट भगत, शिला बघेले, छाया चन्ने, वनिता इंगळे, मनिषा चकोले आदी कर्मचारी लसीकरण मोहीमेसाठी सहकार्य करीत आहेत.
गंगाबाईत गोवर-रुबेला लसीकरणाची पूर्वतयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 9:22 PM
राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत संपूर्ण देशभरात मंगळवारपासून (दि.२७) गोवर-रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासन देखील गोवर-रुबेला लसीकरणासाठी सज्ज झाले असून याची पूर्वतयारी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. फुलचंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात......
ठळक मुद्देपूर्वतयारी प्रशिक्षण कार्यशाळा : विशेष व्हॅनद्वारे लसींचा साठा उपलब्ध