लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. विविध वृत्तपत्रांतून येणाऱ्या पेडन्यूज, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून येणाऱ्या जाहिराती आणि समाजमाध्यमांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष राहणार आहे. जिल्ह्यात निवडणुकीच्या काळात अवैध दारु विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. विधानसभा मतदार संघनिहाय खर्चाचा अहवाल दररोज सादर करावा असे निर्देश भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे निवडणूक खर्च निरीक्षक नाकीडी सृजन कुमार यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सोमवारी (दि.१८) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. राजा दयानिधी प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना सृजनकुमार यांनी, जिल्ह्यात निवडणुकीच्या काळात जिथे तपासणी नाके लावलेले आहेत त्या नाक्यांवर अत्यंत बारकाईने तपासणी करावी. पैसा व दारु जिल्ह्यात येणारच नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. काही राज्यांत मागील निवडणुकीत रूग्णवाहिका आणि पोलीस गाडीचा वापर पैसा आणि दारुचा पुरवठा करण्यासाठी झाल्याची बाब निवडणूक आयोगाच्या लक्षात आल्याने याबाबत जिल्ह्यात दक्षता घेण्यास त्यांनी सांगितले. परवाना प्राप्त मद्य विक्रीच्या दुकानात मद्याचा साठा किती आहे याची दररोज तपासणी करावी असेही निर्देश त्यांनी दिले.जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी, विविध राजकीय पक्षांचे मतदान आणि मतमोजणी प्रतिनिधी यांच्या भोजनाचा खर्च देखील पक्षाच्या निवडणूक खर्चात समावेश करावा. कोणत्या राजकीय पक्षांची किती वाहने प्रचारात आहेत याकडे निवडणूक यंत्रणेने लक्ष द्यावे. त्यांचे होर्डिंग किती आहेत तसेच जाहिरसभा असल्यास तेथे पक्षाचा की उमेदवाराचा प्रचार झाला यावर बारीक नजर ठेवण्याचे निर्देश या वेळी दिले.यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे, सहायक राज्य कर आयुक्त पी.एन.मालठाणे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जि.प.उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी आरती नागरे, जि.प.लेखाधिकारी शत्रुघ्न मसराम, स्थानिक लेखा शाखेचे मांढरे, लेखाधिकारी वासनिक उपस्थित होते.
खर्चाचा अहवाल दररोज सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 9:47 PM
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. विविध वृत्तपत्रांतून येणाऱ्या पेडन्यूज, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून येणाऱ्या जाहिराती आणि समाजमाध्यमांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष राहणार आहे. जिल्ह्यात निवडणुकीच्या काळात अवैध दारु विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी.
ठळक मुद्देनाकीडी सृजन कुमार : विधानसभा मतदारसंघनिहाय खर्च सादर करण्याचे निर्देश