लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शनिवारी (दि.२९) सहशालेय उपक्र मांतर्गत सांस्कृतिक प्रमुख ए. पी. मेश्राम यांच्या मार्गदर्शनात विविध कला गुण प्रदर्शन कार्यक्र म घेण्यात आला. याप्रसंगी डब्लू. एम. परशुरामकर, आय. वाय. रहांगडाले, जी. बी. डोंगरवार, सी. एम. भीवगडे, एन. आर. गिरेपुंजे, आशिक मेश्राम उपस्थित होते.शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास व्हावा यासाठी वर्षभर सहशालेय कार्यक्रमांचे आयोजन शाळेत केले जाते.योगासने, प्राणायाम, आणापाण सराव इत्यादी उपक्रम दर शनिवारी राबविण्यात येणात. त्यानुसार, शनिवारी इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध कला गुण प्रदर्शन कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता.यात गीत गायन स्पर्धेत नेमीता बुरले व ग्रुप, बाली डोंगरवार, जयश्री प्रधान, रोहिणी लांजेवार व ग्रुप, अक्षरा बागडे, उमा राजगिरे, मयंक झाडे, पौर्णिमा प्रधान, लक्ष्मी कोहळे, राहुल मुंगुलमारे, सपना चांदेवार, निरंजना चनाप, कोमल पुसाम, कुमकुम मेश्राम, निरजरा बागडे यांनी सहभाग घेतला.तसेच पथनाट्य सादरीकरणात अक्षरा बागडे व ग्रुप, निरजरा बागडे व ग्रुप यांनी ‘दारूड्या रामूची कथा’, कुणाल शेंडे व ग्रुप, निकेत गिरेपुंजे व ग्रुप यांनी ‘मुलगा नापास झाला’ ही नाटकं सादर केली. तर अक्षरा बागडे यांनी समूह नृत्य गीत सादर केले. कुमकुम मेश्राम व ग्रुप यांनी ‘तुझे सलाम इंडिया’ हे देशभक्ती नृत्य गीत तर निकेत गिरेपुंजे व अक्षरा बागडे ग्रुप यांनी ‘कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले’ हे राष्ट्रभक्ती नृत्य गीत सादर केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना एक एक पेन भेट देण्यात आला. एन. आर. गिरेपुंजे व जी. बी. डोंगरवार यांनी गीत गायन, नृत्य गीत, पथनाट्य सादरीकरण याबाबत काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या.संचालन विशाखा मुनिश्वर व कुमकुम मेश्राम यांनी केले. आभार निरजरा बागडे हिने मानले.
सहशालेय उपक्र मांतर्गत कलागुण सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 5:00 AM
जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शनिवारी (दि.२९) सहशालेय उपक्र मांतर्गत सांस्कृतिक प्रमुख ए. पी. मेश्राम यांच्या मार्गदर्शनात विविध कला गुण प्रदर्शन कार्यक्र म घेण्यात आला. याप्रसंगी डब्लू. एम. परशुरामकर, आय. वाय. रहांगडाले, जी. बी. डोंगरवार, सी. एम. भीवगडे, एन. आर. गिरेपुंजे, आशिक मेश्राम उपस्थित होते.
ठळक मुद्देसांस्कृतिक विभाग : जिल्हा परिषद हायस्कूलमधील उपक्रम