शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

दरवाढीने गॅस सिलिंडरची जागा घेतली आता चुलीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 5:00 AM

गॅस सिलिंडरशिवाय स्वंयपाकघराची कल्पना करताच येत नाही. केंद्र सरकारनेसुध्दा धूर आणि चुलीपासून महिलांना मुक्ती मिळवून देण्यासाठी उज्ज्वला योजनेंतर्गत गोरगरीब कुटुंबांना गॅस संच उपलब्ध करून दिले. सुरुवातीला गॅस सिलिंडरचे दर कमी असल्याने याचा अनेक लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यामुळे ग्रामीण भागात चुलीची जागा गॅस सिलिंडरने घेतली होती. यामुळे वृक्षतोडीलासुध्दा काही प्रमाणात आळा बसला होता. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीपाठोपाठ गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ केली जात असल्याने गृहिणींचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे. आठ महिन्यांत गॅस सिलिंडरच्या किमती १६५ रुपयांनी वाढल्या आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचा वापर करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात गॅस सिलिंडरच्या दरवाढीने पुन्हा चुली पेटल्याचे चित्र आहे.गॅस सिलिंडरशिवाय स्वंयपाकघराची कल्पना करताच येत नाही. केंद्र सरकारनेसुध्दा धूर आणि चुलीपासून महिलांना मुक्ती मिळवून देण्यासाठी उज्ज्वला योजनेंतर्गत गोरगरीब कुटुंबांना गॅस संच उपलब्ध करून दिले. सुरुवातीला गॅस सिलिंडरचे दर कमी असल्याने याचा अनेक लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यामुळे ग्रामीण भागात चुलीची जागा गॅस सिलिंडरने घेतली होती. यामुळे वृक्षतोडीलासुध्दा काही प्रमाणात आळा बसला होता. मात्र मागील वर्षभरापासून गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत. ४०० रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता ९१० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या ते आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे अनेकांनी गॅस सिलिंडरचा वापर बंद केला असून, पुन्हा चुलीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. गॅस सिलिंडरच्या दरवाढीने पुन्हा चुली पेटू लागल्याचे चित्र आहे. यामुळे महिलांना चुलीच्या धुरापासून सुटका मिळणे कठीणच दिसत आहे. 

एकदा हजार रुपये दर करून टाकावाढत्या महागाईमुळे आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोविडमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यातच आता केंद्र सरकारकडून गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. तर दुसरीकडे अनुदानातसुध्दा मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. गॅस सिलिंडरचे दर ९१० रुपयांवर पोहोचल्याने गृहिणींमध्ये संताप व्यक्त होत असून, एकदाचे गॅस सिलिंडरचे दर एक हजार रुपये करून टाका, अशा शब्दात गृहिणींनी संताप व्यक्त केला आहे. 

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर