नगरसेवकांनी दिल्या सूचना : गोंदिया पालिकेचे २९४.४० कोटींचे अंदाजपत्रकगोंदिया : शहरातील स्वच्छता, रस्त्यांची दुरूस्ती व वीज पुरवठा यांना प्राधान्य देत गोंदिया नगर परिषदेने नवीन आर्थिक वर्षासाठी २९४.४० कोटींचे अंदाजपत्रक सादर केले. सन २०१५-१६ चे अंदाजपत्रक तसेच २०१५-१६ च्या मसूदा अंदाजपत्रकावर चर्चा करून त्यावर नगरसेवकांच्या सूचना मागविण्यासाठी शुक्रवारी (दि.२६) पालिकेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन केले होते. यात नगरसेवकांनी आपल्या सूचना मांडल्या. नगर परिषदेचे सन २०१६-१७ चे मसूदा अंदाजपत्रक तयार झाले आहे. या अंदाजपत्रकात नगसेवकांना आणखी काही बदल किंवा एखाद्या विषयावर तरतूद आदि विषयांवर चर्चा करून नगरसेवकांच्या सूचना घेतल्या जातात व त्यासाठी शुक्रवारी (दि.२६) पालिकेच्या सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. नगराध्यक्षांनी बोलाविलेल्या या विशेष सभेत पालिकेने २९४. ४० कोटींचे मसूदा अंदाजपत्रक मांडले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्य अंदाजपत्रकात १० टक्के वाढ करण्यात आली आहे. या सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बहुतांश सदस्य गैरहजर असल्याचे दिसले. ६० टक्के सदस्यांच्या उपस्थितीतच सभा पार पडली. दोन तासांत पार पडलेली ही सभा गोंधळाविना शांततेत पार पडली. (शहर प्रतिनिधी)
शहरात स्वच्छता, रस्ते व विजेला प्राधान्य
By admin | Published: February 28, 2016 2:05 AM