२६ गावांसाठी ४.३५ कोटी खर्च : टप्प्याटप्प्याने होणार १८६ गावांचा विकास देवानंद शहारे ल्ल गोंदिया नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या बफर झोन अंतर्गत मोडणाऱ्या गावांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील १८६ गावांचा विकास करण्याचे उद्दिष्ट निर्धारित आहे. प्रथम व द्वितीय चरणात दोन्ही जिल्ह्यातील ६३ गावांच्या विकासास प्राधान्य देण्यात आले आहे. विशेष म्हणजे आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील २६ गावांच्या विकासासाठी ४.५१ कोटी रूपये उपलब्ध करण्यात आले होते. यापैकी ४.३५ कोटी रूपये विविध विकास कार्यांवर खर्च करण्यात आले आहेत. तर आर्थिक वर्ष २०१६-१७ साठी सदर योजनेंतर्गत ३८ गावांसाठी ७.०३ कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही रक्कम खर्च होणे बाकी असून त्याबाबत नियोजन सुरू आहे. सन २०१५-१६ मध्ये दोन चरणात निधी वाटप करण्यात आला. यात १० गावांना प्रत्येकी २१-२१ लाख रूपये देण्यात आले. तर दुसऱ्या चरणात १६ गावांना प्रत्येकी १५-१५ लाख रूपये वाटप करण्यात आले. दुसऱ्या वर्षी सन २०१६-१७ मध्ये ३८ गावांना प्रत्येकी १९ लाख रूपयांचे वितरण करण्यात आले आहे. या गावांमध्ये विकास कार्ये होणे बाकी आहे. विकास कार्यांवर झालेला खर्च ४डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेत वनविभाग व्याघ्र प्रकल्पांतर्गत मोडणाऱ्या बफर झोनमधील गावांतील नागरिकांच्या गरजा लक्षात घेवून त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याचे कार्य करते. यामागे गावाला लागलेल्या जंगल संपत्तीच्या संरक्षणासाठी सहकार्य, हे उद्देश आहे. त्यामुळे वृक्षांची अवैध कटाई व चोरी थांबविली जावू शकते. वनात प्राणी चारण्यावर प्रतिबंध लागेल. याच उद्देशाला घेवून आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये २६ गावांत दोन हजार ६४८ एलपीजी गॅस सिलिंडर वाटप करण्यात आले. चार हजार ७५६ एलपीजी रिफिलिंग करण्यात आले. १६९ दुधाळू जनावरांचे वाटप करण्यात आले. ३०३ विहिरींवर पक्के चबुतरे बनविण्यात आले. १०१ ठिकाणी सोलर पंपवर वीज व्यवस्था करण्यात आली. २४ शेततळे व तलावांचे खोलीकरण करण्यात आले. ३९८ शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. ९०८ किचन ओटे प्रदान करण्यात आले. एक हजार २३१ निर्धूल चुलींचे वाटप करण्यात आले. सिमेंटचे १६ बंधारे बांधण्यात आले. नऊ कचरा कुड्यांची सोय करण्यात आली. दोन आरओ वॉटर फिल्टर मशीन व दोन समर्सिबल पंप पुरविण्यात आले.
बफर झोनमधील ६४ गावांच्या विकासास प्राधान्य
By admin | Published: January 09, 2017 12:49 AM