लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सन २०१७-१८ करीता जलयुक्त शिवार योजनेचा प्रारूप तयार करताना शासकीय निधीतून लोकहितांच्या कामांना प्राधान्य देण्याचे प्रयत्न करण्यात यावे, असे निर्देश आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिले. तालुका जलयुक्त शिवार योजना समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उप विभागीय अधिकारी अनंत वालस्कर, तहसीलदार अरविंद हिंगे, सहायक वनसंरक्षक शेंडे, उप विभागीय अभियंता नागभिरे, खंड विकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागाचे उप विभागीय अभियंता चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, मागील वर्षी निर्मित गैबीयन बंधारे गायब झाले आहेत. तर लघू पाटबंधारे विभाग स्थानिक स्तरकडून निर्मित बंधाऱ्यांत एक लीटर पाणी संग्रहीत होण्याची स्थिती नाही. या बंधाऱ्यांच्या दोन्ही बाजूला समतल मैदान असून पाणी संग्रहणाची स्थिती नसल्याचे सांगीतले. तसेच विविध विभागांच्या माध्यमातून शेकडो जलसंधारणाची कामे पूर्ण झाल्याचे आकडे सांगतात. मात्र प्रत्यक्षात काहीच बदल दिसून येत नाही. त्यामुळे २०१७-१८ करीता सविस्तर अध्ययन करून उपयोगी कामांनाच मंजुरी देण्याचेही आमदार अग्रवाल यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर काही कामांची प्रत्यक्षात दौराकरून पाहणी करण्याचे निर्देशही त्यांनी उपविभागीय अधिकारी वालस्कर यांना बैठकीत दिले.
शासकीय निधीतून लोकहितांच्या क ामांना प्राधान्य
By admin | Published: May 07, 2017 12:18 AM