शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

मालमत्ता थकबाकीदारांची अडचण वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 5:00 AM

शहरातील मालमत्ता धारकांकडून मागील कित्येक वर्षांपासून मालमत्ता करण्यात आले नसल्याचे दिसत आहे. परिणामी आजघडीला सहा कोटी २२ लाख ५८ हजार ८१० रूपयांची थकबाकी असून यंदाची मागणी चार कोटी ८१ लाख १३ हजार ४२१ एवढी आहे. म्हणजेच, नगर परिषदेला यंदा ११ कोटी तीन लाख ७२ हजार २३१ रूपये मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट आहे. नगर परिषद कर विभागातील कर्मचारी मालमत्ता धारकांकडे वसुलीसाठी जातात.

ठळक मुद्दे खरेदी-विक्री करता येणार नाही : नगर परिषदेचा लिलाव करण्याचा अधिकार, बजावणार आहे नोटीस

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  वारंवार मागणी करूनही मालमत्ता कराची रग्गड रक्कम थकवून बसलेल्या मालमत्ताधारकांची आता अडचण वाढणार आहे. अशा मालमत्ताधारकांच्या मालमत्तांची खरेदी-विक्री करता येणार नसून त्यावर कर्जही घेता येणार नाही. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे, अशा मालमत्तांचा लिलाव करण्याच आधिकार नगर परिषदेला राहणार असल्याचे पत्रच मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी काढले आहे. शिवाय कर वसुली पथक कंबर कसून मैदानात उतरले असल्याने मालमत्ता कर वसुलीचा हा अध्याय आता कोणते वळण घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरातील मालमत्ता धारकांकडून मागील कित्येक वर्षांपासून मालमत्ता करण्यात आले नसल्याचे दिसत आहे. परिणामी आजघडीला सहा कोटी २२ लाख ५८ हजार ८१० रूपयांची थकबाकी असून यंदाची मागणी चार कोटी ८१ लाख १३ हजार ४२१ एवढी आहे. म्हणजेच, नगर परिषदेला यंदा ११ कोटी तीन लाख ७२ हजार २३१ रूपये मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट आहे. नगर परिषद कर विभागातील कर्मचारी मालमत्ता धारकांकडे वसुलीसाठी जातात. मात्र त्यांना मालमत्ता धारक टोलवून देत असल्याने ही रक्कम वाढतच चालली आहे. मात्र कोट्यवधींच्या घरात असलेली रक्कम अडकून पडल्याने त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होतो. तरिही मागील कित्येक वर्षांपासून हा प्रकार चालत आला आहे. या गंभीर प्रकाराकडे मुख्याधिकारी चव्हाण लक्ष घातले असून त्यांनी मालमत्ताधारकांना थेट नोटीस बजावण्याचे आदेश पथकाला दिले आहे. तसेच नगर परिषद, नगर पंचायत औद्योगीक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १५२, १५५, १५६ नुसार मालमत्ता कर थकवून ठेवणाऱ्या मालमत्ता धारकांची मालमत्ता खरेदी-विक्री किंवा कोणत्याही मार्गाने नगर परिषदेच्या परवानगी शिवाय हस्तांतरीत करता येणार नाही. मालमत्तेवर कोणत्याही स्वरूपाचे कर्ज, बोजा घेता येणार नाही असे आदेशच काढले आहे. त्यानुसार, मालमत्ता कर विभागाकडून आता थकबाकीदारांना नोटीस बजावले जाणार आहे. सुटीच्या दिवशीही पथक वसुलीवर यंदा नगर परिषद मालमत्ता कर विभागावर ११ कोटी वसुलीचे टार्गेट आहे. मागील वर्षी जेमतेम ३७-३८ टक्के कर वसुली झाली होती. ही बाब लक्षात घेत मुख्याधिकारी चव्हाण यांनी पथक गठीत करून आतापासूनच कर वसुली मोहीम छेडून दिली आहे. विशेष म्हणजे, पथक शनिवारी सुटीच्या दिवशीही वसुलीवर होते. शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत पथकाने १२ लाख २१ हजार ५३० रूपयांची वसुली केली आहे.मालमत्तांचा लिलाव करणार नगर परिषदेने काढणाऱ्या नोटीसनुसार मालमत्ता धारकांना नोटीस बजावल्यानंतर ३ दिवसांची मुदत दिली जाणार असल्याची माहिती आहे. त्या मुदतीत संबंधिताने मालमत्ता कर न भरल्यास त्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा पूर्ण अधिकार नगर परिषदेला राहणार असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर, या आदेशाच्या अंमलबजा‌वणीत अडथळा आणल्यास शासकीय कामात अडथळा आणण्यासाठी भारतीय दंड संहितेंतर्गत लागू इतर अधिनियांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.  

टॅग्स :Taxकर