लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे संपूर्ण विदर्भात गुरुवारी (दि.१) वीज ग्राहकांचे निम्मे वीज बिल माफ करा, कृषी पंपाचे बिल पूर्ण माफ करा, ग्रामीण भागातील भारनियम बंद करा,या मागणीला आंदोलन करण्यात आले. पॉवरहाऊस येथील उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करुन निषेध नोंदविण्यात आला.या वेळी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे उपकार्यकारी अभियंत्यांना दिले. निवेदनातून वाढीव वीज बिलामुळे झोपडपट्टीवासीय सामान्य जनता, शेतकरी, व्यापारी व कारखानदारांसह राज्यातील संपूर्ण जनता त्रस्त झाली आहे. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात विजेचे दर जास्त आहे. त्यामुळे विदर्भातील जनता विजेच्या आर्थिक बोझ्याखाली दबत आहे.राज्यातील कारखानदारीचे वीज दर हे सर्वात जास्त असल्यामुळे विदर्भात उद्योग येत नाही.त्यामुळे खाजगी नोकरीचा प्रश्न सुध्दा निर्माण झाला आहे.विजेचे दर १०० युनिटसाठी दिल्लीमध्ये १.२५ रुपये, गुजरातमध्ये ३.४३ रु,छत्तीसगडमध्ये ३.६७ रु, हरिणायामध्ये ३.६५ रु, तर महाराष्ट्रामध्ये ५.१० रुपये असे आणि ५०० युनिटसाठी दिल्लीमध्ये ३.५० रु,गुजरातमध्ये ४.४५, छत्तीसगडमध्ये ४.५४, हरियाणामध्ये ६.०३ रुपये तर महाराष्ट्रामध्ये ११.५७ रुपये असे आहेत. महाराष्ट्रात औष्णीक वीज प्रकल्पाने जमीन विदर्भाची, कोळसा पाणी विदर्भातले मात्र सर्वाधिक महाग वीज विदर्भातच आहे. त्यामुळे ही वीज दरवाढ मागे घेऊन वीज ग्राहकांचे निम्म वीज बिल माफ करण्याची मागणी या वेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष पी.बी.गंगाबोईर, लेखराम चांदेवार, देवराज जगणे, अॅड.व्ही.एस. बारसे,अॅड.सचिन बावरीया, अॅड.आशा भाजीपाले, चंद्रदास लांडेकर, अॅड. मुकेश शहारे, मुकेश खांडवाये, मंगेश राऊत, संतोष शहारे, देवकुमार पडोटी, अनारबाई जामकाटे,मंदिरा ब्रम्हनाईक, भाऊराव बडोले आदिंचा समावेश होता.
वीज बिलाची होळी करुन केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 11:30 PM
विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे संपूर्ण विदर्भात गुरुवारी (दि.१) वीज ग्राहकांचे निम्मे वीज बिल माफ करा, कृषी पंपाचे बिल पूर्ण माफ करा, ग्रामीण भागातील भारनियम बंद करा,या मागणीला आंदोलन करण्यात आले. पॉवरहाऊस येथील उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करुन निषेध नोंदविण्यात आला.
ठळक मुद्देविदर्भ आंदोलन समितीचे आंदोलन : वीज दरात कपात करा