लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : सोमवारी (दि.१) भिमा कोरेगाव येथे भिम सैनिकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तालुक्यातील सर्व बौद्ध समाजाच्यावतीने मंगळवारी (दि.२) निषेध मोर्चा काढून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. हा मोर्चा कोहमारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघाला व तहसील कार्यालय येथे पोहचून सभेत परिवर्तीत झाला. येथे तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.भंते संघधातू यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात मनोहर चंद्रिकापुरे, राजेश नंदावगळी, भाऊदास जांभुळकर, प्रा.आर.के.भगत, निशांत राऊत, डॉ. श्रद्धा रामटेके यांनी संबोधीत केले.निषेध मोर्चात जितेंद्र मौर्य, उर्मिला चिमनकर, निना राऊत, अतुल फुले, उमेश घरडे, सिध्दार्थ उंदिरवाडे, उदाराम लाडे, हर्षा राऊत, राजेश फुले, रामलाल शहारे, राहुल गणवीर, रोषण बडोले यांच्यासह मोठ्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते.गोंदियात सभा घेऊन नोंदविला निषेधगोंदियात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, भारिप-बहुजन महासंघ, समता संग्राम परिषद व अन्य संघटनांच्यावतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ््याजवळ निषेध सभा घेण्यात आली. दरम्यान या घटनेतील दोषींवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. याप्रसंगी बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश सचिव डी.एस.मेश्राम, अशोक बेलेकर, अतुल सतदेवे, जय इंगोले, डॉ. मनोज राऊत, वाय.एम.रामटेके, मधु बंसोड, एच.आर.लाडे, धिरज मेश्राम, सतीश बंसोड, विनोद मेश्राम, नरेंद्र बोरकर, किरण फुले, राजू राहूलकर यांच्यासह मोठ्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते.
मोर्चातून नोंदविला घटनेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 11:49 PM
सोमवारी (दि.१) भिमा कोरेगाव येथे भिम सैनिकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तालुक्यातील सर्व बौद्ध समाजाच्यावतीने मंगळवारी (दि.२) निषेध मोर्चा काढून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
ठळक मुद्दे भीमा कोरेगाव प्रकरण : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन