लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यास सर्वत्र पावसाचा प्रकोप सुरू असताना जिल्ह्यात मात्र आजही दमदार पावसाच्या प्रतिक्षेत जिल्हावासी आहेत. सुरूवातीपासूनच पावसाने खेळी केल्याने शेतीची कामे रखडली असतानाच आजही जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प तहानलेलेच दिसून येत आहेत. या प्रकल्पांत आजही मोजकाच पाणीसाठा असून दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जून महिन्यात पावसाने दगा दिला. त्यानंतर जुलै महिन्यात काही काळ पाऊस बरसला मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. आता जेमतेम मागील आठ दिवसांपासून पाऊस परतून आला असून संततधार रिमझीम पाऊसच बरसला. या पावसामुळे शेतीची कामे पुन्हा जोमात सुरू झाली असून अडकून पडलेल्या रोवण्यांना वेग आला आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असतानाच शेतकऱ्याच्या चेहºयावर हसू आले आहे. मात्र रिमझीम बरसलेल्या या पावसामुळे प्रकल्पांना पाहिजे तसा फायदा झालेला दिसून येत नाही.जिल्ह्याला वर्षभर पाण्याची सोय करून देणारे चार प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत आजही मोजकाच पाण़ीसाठा असून भर पावसाळ््यात हे प्रकल्प तहानलेलेच दिसून येत आहेत. जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात आजही फक्त ४६.५१ टक्के पाणीसाठा आहे. सिरपूर प्रकल्पात ३१.६६ टक्के, पुजारीटोला प्रकल्पात ५६.६० टक्के तर कालीसरार प्रकल्पात २७.९९ टक्के पाणीसाठा आहे. यावरून भर पावसाळ््यात या प्रकल्पांची अशी स्थिती असल्याने आणखी दमदार पावसाची गरज दिसून येत आहे.येणारा काळ कठीणजिल्ह्यात पावसाने सुरूवातीपासूनच खेळी केल्याने शेतीची कामे अडकून पडली. परिणामी आजही कि त्येक शेतकऱ्यांची रोवणी झालेली नसल्याचे दिसत आहे. याशिवाय कमी पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख चार प्रकल्पांत पाहिजे त्या प्रमाणात पाणीसाठा नाही. या प्रकल्पात पुरेपूर पाणीसाठा राहणे जिल्ह्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण या प्रकल्पांतूनच जिल्ह्याला उन्हाळ््यात पाणी पुरविले जाते. त्यामुळे हे प्रकल्प न भरल्यास येणारा काळ मात्र कठीण जाणार यात शंका नाही.
जिल्ह्यातील प्रकल्प आजही तहानलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 11:22 PM
राज्यास सर्वत्र पावसाचा प्रकोप सुरू असताना जिल्ह्यात मात्र आजही दमदार पावसाच्या प्रतिक्षेत जिल्हावासी आहेत. सुरूवातीपासूनच पावसाने खेळी केल्याने शेतीची कामे रखडली असतानाच आजही जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प तहानलेलेच दिसून येत आहेत. या प्रकल्पांत आजही मोजकाच पाणीसाठा असून दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
ठळक मुद्देमोजकाच पाणीसाठा : दमदार पावसाची प्रतीक्षा कायम