गोंडमोहाडी-अत्री रस्ता गेला खड्ड्यात
परसवाडा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गोंडमोहाडी-अत्री-दवनीवाडा रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडून सांगण्यात आले आहे.
बैलबाजारांना उतरती कळा
गोंदिया : एकेकाळी प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील बैलबाजार सध्या आपले मोल हरवून बसल्याचे दिसत आहे. यांत्रिक शेतीमुळे बैलजोड्या विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
बंधारा असूनही उपयोग नाही
सडक अर्जुनी : तालुक्यातील ग्राम राका-सौंदड मार्गावरील चूलबंद नदीवर कोल्हापुरी बंधारा असून, त्याचा काहीच उपयोग घेतला जात नाही.
भर रस्त्यावर जनावरांचा ठिय्या
गोरेगाव : शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
विकासकामांना खीळ
गोंदिया : कोरोना संकटाने ग्रामीण भागात कर वसुली झाली नसल्याने विकासकामांना ब्रेक लागला आहे, तसेच पंधरावा वित्त आयोगाची रक्कम खर्चाची मंजुरी मिळाली नसल्याने गावविकास रखडला आहे. ग्रापंचायतींना खर्च मंजुरीचे आदेश द्यावेत, अशी मागणी आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा रामभरोसे
गोंदिया : ग्रामीण भागातील आरोग्य सेवक, कर्मचारी व केंद्रात नियुक्त शासकीय डॉक्टर मुख्यालयी राहत नसल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णांना सेवा मिळावी हा शासनाचा उदात्त हेतू आहे.