गोंदिया : मागासवर्गीय कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यात याव्या यासाठी मंगळवारी (दि.१७) कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी दिलीप खोटेले यांना नियोजित बैठकीत निवेदन देण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी जनार्दन राऊत व प्रशासन अधिकारी गौरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी, सुधारित आश्वासित प्रगती योजना १ जानेवारी २०१६ पासून लागू करावी, जि.प. शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव अविलंब जिल्हा परिषदेला पाठवावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन विक्री अंशराशीकरण राशीत्वरित देण्यात यावी, सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता, शिक्षकांचे उच्च परीक्षेला बसण्याचे व परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे कार्योत्तर परवानगी अर्ज जिल्हा परिषदेला पाठवावे, मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक, अधिकाऱ्यांना उपदान, अंशराशीकरण, रजा रोखीकरण, भविष्य निर्वाह निधी व गट विमा राशी तातडीने प्रदान करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी आदी मागण्या मांडल्या व त्यांचे निवेदन दिले. या सर्व समस्या तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन खंडविकास अधिकारी खोटेले यांनी दिले.
यावेळी शिष्टमंडळात शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, सरचिटणीस प्रवीण गजभिये, धर्मशील रामटेके, जितेंद्र बोरकर, निशिकांत मेश्राम, डी.व्ही. सोनकनवरे, व्ही.बी. वैद्य, महेश वैद्य, रोशन गजभिये, के.के.कठाणे, एम .एस.परिहार, एन.डी. थाटे, पारधी, नायडू उपस्थित होते.