लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जीवनशैलीतील बदलामुळे हृदयविकाराच्या रूग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हृदयविकाराच्या झटक्याने कोणत्याही रूग्णाला धोका होऊ नये, वेळेवर उपचार करण्यासाठी समाजसेवेचे ध्येय बाळगून सुवर्ण पदक प्राप्त कॉर्डीओलॉजीस्ट डॉ. प्रमेश गायधने यांनी महाकॅप नावाने व्हॉटस्अॅप ग्रुप तयार करून त्यात अनेक तज्ज्ञांचा समावेश केला आहे.ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टराना मोफत मार्गदर्शन करून हृदयविकारावर मात करण्याचा त्यांचा माणस आहे.ग्रामीण भागातील डॉक्टर रूग्णांसंबधी सर्व माहिती त्या ग्रुपवर टाकतात त्यावर विशेष तज्ज्ञ मोफत वेळीच मार्गदर्शन करतात. परिणामी रूग्णांना वाचविण्यात यश येते. महाकॅप म्हणजे महाराष्ट्र कॉर्डीओलॉजी जनजागृती कार्यक्रम असे म्हटले आहे. महाकॅप राज्यासह देशातील २० डीएम कॉर्डीओलॉजीस्ट सहभागी आहेत. ते सर्व सेवा करण्यासाठी सोबत जुळले आहेत. कर्नाटकच्या बंगळुरु येथे सेवा देणारे डॉ. कामत हे सुध्दा मोफत सेवा देणार आहेत. या ग्रुपमधील डॉ. वैभव यावलकर, डॉ.आशिष बनपूरकर यांच्यासह दुसऱ्या राज्यातील विशेषतज्ज्ञ सहभागी झाले आहेत. गावातील डॉक्टरांना रूग्णांचा त्रास व ईसीजी रिपोर्ट पोस्ट केल्यास तज्ज्ञांच्या माध्यमातून तपासणी केली जाईल.तयार करण्यात आलेला हा ग्रुप सद्यास्थितीत फक्त गोंदियासाठी आहे. या ग्रुपमध्ये २०० डॉक्टर जुळलेले आहेत.भविष्यात ग्रुप अॅडमिनकडून प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत ईसीजी मशीन वाटप केली जाणार आहे.महाकॅप नावाचा ग्रुप गोल्ड होअर संकल्पनेवर आधारीत असल्याचे डॉ. गायधने म्हणाले. हृदयविकाराचा झटका येताच तासाभराच्या आत उपचार झाला तर ते उत्तम असते. त्याचा रूग्णालाही मोठा फायदा होतो.कर्नाटक येथे अशाच प्रकारच्या ग्रुपमुळे हजारो रूग्णांना फायदा झाला. वेळीच सल्ला व उपचार दिल्याने रूग्ण वाचू शकतो. रात्रीच्या वेळीच शहरातील रूग्णालयात पोहचविण्याच्या अगोदर त्यांना सल्ला मिळू शकतो. ग्रामीण भागातील डॉक्टरांना मोफत सल्ला देण्यासाठी हा ग्रुप तयार करण्यात आला आहे. महाकॅपमध्ये शासकीय व खासगी डॉक्टर सुध्दा सहभागी होऊ शकतात. हृदयविकारावर जनजागृती करण्यासाठी हा ग्रुप तयार करण्यात आला आहे. ह्या ग्रुपवर मिळणारी माहिती मोफत किंवा कोणत्याही खासगी रूग्णालयाशीसंबधी नाही,असे सांगण्यात आले.- डॉ.प्रमेश गायधनेहृदयरोग तज्ज्ञ
हृदयविकाराच्या झटक्यापासून रूग्णांचा बचाव करणार‘महाकॅप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 6:00 AM
ग्रामीण भागातील डॉक्टर रूग्णांसंबधी सर्व माहिती त्या ग्रुपवर टाकतात त्यावर विशेष तज्ज्ञ मोफत वेळीच मार्गदर्शन करतात. परिणामी रूग्णांना वाचविण्यात यश येते. महाकॅप म्हणजे महाराष्ट्र कॉर्डीओलॉजी जनजागृती कार्यक्रम असे म्हटले आहे. महाकॅप राज्यासह देशातील २० डीएम कॉर्डीओलॉजीस्ट सहभागी आहेत. ते सर्व सेवा करण्यासाठी सोबत जुळले आहेत.
ठळक मुद्देरूग्णांसाठी वरदान : व्हॉट्सअॅपवरून होताहे जनजागृती, दोनशे डॉक्टरांचा समूह करतोय मार्गदर्शन