तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन आर्थिक मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:53 PM2019-07-26T23:53:22+5:302019-07-26T23:53:49+5:30
सालेकसा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत निधी देण्यात यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने तहसीलदार सी.जी. पित्तुलवार यांना निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : सालेकसा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत निधी देण्यात यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने तहसीलदार सी.जी. पित्तुलवार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात, प्रत्येक शेतकºयाला प्रति एकर ३० हजार रुपये प्रमाणे मदत निधी जाहीर करुन ती त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, कृषी पंप धारकांना २४ तास वीज पुरवठा व्हावा, मागणी करणाºया शेतकºयांना वीज कनेक्शन त्वरीत देण्यात यावे, कृषीचे विद्युत बिल माफ करण्यात यावे, घरगुती बिलातही ५० टक्के कपात करण्यात यावी, रब्बी पिकाला सुद्धा बोनस देण्यात यावे, सर्व शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे, धानाला तीन हजार रूपये प्रमाणे हमी भाव देण्यात यावा, सम २०१६ मध्ये घोषित गावांना मदत निधी त्वरित देण्यात यावा, मनरेगा अंतर्गत विविध कामातून लोकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा या आणि इतर मागण्यांचा समावेश आहे.
काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांच्या नेतृवात निवेदन देताना माजी मंत्री भरत बहेकार, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, पं.स. सभापती अर्चना राऊत, उपसभापती दिलीप वाघमारे, तालुकाध्यक्ष वासुदेव चुटे, नामदेव कटरे, विजय टेकाम, लखन अग्रवाल, कैलास अग्रवाल, पुरुषोत्तम बनोठे, रामविलास बनोठे, जितेंद्र बल्हारे, वसंत पुराम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.