लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : परिसरातील बहुतेक गावांमध्ये पावसाचा फटका बसला असून घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे कित्येक लाभार्थ्यांना नाव घरकुल यादीत असूनही अजूनपर्यंत शासन किंवा पंचायत समिती मार्फत त्यांची कसल्याही प्रकारे चौकशी करण्यात आलेली नाही. यामुळे त्यांना धोकादायक घरांमध्येच दिवस काढाने लागत असल्याने त्वरीत घरकुल देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.पावसामुळे कित्येकांचे घर पडले किंवा अंशत: नुकसान झाले आहे. मात्र अशी घरे कधी पडणार याचा नेम नाही. असे असतानाही या परिवारांना त्याच धोकादायक घरांमध्ये दिवस काढावे लागत आहे. विशेष म्हणजे, नुकसानग्रस्तांमध्ये काहींना पंतप्रधान घरकुल योजनेत घरकुल मंजूर झाले असून त्यांचे नाव यादीत आहे. तर काहींचे नाव नसल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे. अशात यादित नाव असलेल्यांना त्वरित घरकुल देण्यात यावे व उर्वरितांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
नुकसानग्रस्तांना त्वरित घरकुल द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 10:49 PM
पावसामुळे कित्येकांचे घर पडले किंवा अंशत: नुकसान झाले आहे. मात्र अशी घरे कधी पडणार याचा नेम नाही. असे असतानाही या परिवारांना त्याच धोकादायक घरांमध्ये दिवस काढावे लागत आहे. विशेष म्हणजे, नुकसानग्रस्तांमध्ये काहींना पंतप्रधान घरकुल योजनेत घरकुल मंजूर झाले असून त्यांचे नाव यादीत आहे.
ठळक मुद्देनुकसानग्रस्तांची मागणी : धोक्यात काढत आहेत दिवस