लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उपचाराची आशा बाळगून गरीब रूग्ण येथे येतात. अशात कोणताही रूग्ण आल्यास त्याला दर्जेदार आरोग्य उपलब्ध करवून द्या अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिल्या.सोमवारी (दि.२२) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देवून विविध कक्षांची पाहणी केली. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हिंमत मेश्राम यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.ना. डॉ. फुके यांनी, लायंस क्लब गोंदिया व लायंस क्लब गोंदिया सिनियर यांच्यावतीने निशुल्क भोजनसेवा स्थळी भेट देवून त्यांच्या कामाचे कौतूक केले. त्यांनी आकस्मिक विभाग, सामान्य रु ग्ण कक्ष व परिसराची पाहणी केली.यावेळी त्यांनी उपचार घेत असलेल्या रु ग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध समस्या त्यांनी यावेळी जाणून घेतल्या.वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध समस्या व प्रश्नांबाबत पुढच्या बुधवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्यासोबत बैठक लावण्यात येणार असून विविध समस्या यातून मार्गी लावण्यात येतील असे त्यांनी सांगितले.वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसोबत बैठकयावेळी ना. फु्रके यांनी, वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करु न केटीएस जिल्हा सामान्य रु ग्णालय व बाई गंगाबाई शासकीय स्त्री रु ग्णालयाच्या समस्यांबाबत अवगत करु न दिले. ईथल्या वैद्यकीय महाविद्यालयातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे बैठक लावण्याबाबत डॉ. मुखर्जी यांना सांगितले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध समस्या पालकमंत्री यांच्या लक्षात आणून दिल्या .
रूग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करवून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 9:29 PM
उपचाराची आशा बाळगून गरीब रूग्ण येथे येतात. अशात कोणताही रूग्ण आल्यास त्याला दर्जेदार आरोग्य उपलब्ध करवून द्या अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिल्या. सोमवारी (दि.२२) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देवून विविध कक्षांची पाहणी केली.
ठळक मुद्देपरिणय फुके : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची केली पाहणी