शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
4
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
5
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
6
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
7
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
9
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
10
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
11
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
12
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
13
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
14
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
15
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
16
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
17
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
18
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
19
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
20
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील

गोंदियातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 4:23 AM

गोंदिया : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात संचारबंदी व वर्कफ्रॉम होम सुरू झाले आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढत असून, ...

गोंदिया : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात संचारबंदी व वर्कफ्रॉम होम सुरू झाले आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढत असून, काही भागांत मान्सूनपूर्व वादळी पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर गोंदिया महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेत सुरळीत वीज पुरवठ्यासाठी सज्ज राहावे, अशी सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केली आहे.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रामुख्याने कोविड व इतर सर्व रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती व रिफिलिंग उद्योगांसह सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा. सध्या संचारबंदी व कार्यालयीन उपस्थितीच्या निर्बंधांमुळे खासगी व शासकीय कर्मचाऱ्यांचे वर्कफ्रॉर्म होम सुरू आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विजेची मागणीही वाढत आहे. राज्यात वाढत्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा करण्यास महावितरण सक्षम आहे. मात्र, मान्सूनपूर्व वादळी पावसाला राज्याच्या काही भागांत सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत सुरळीत व अखंडित वीजपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर सज्ज राहावे, अशी सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केली आहे. वादळी पाऊस किंवा अन्य कारणांनी वीजपुरवठा खंडित झाल्यास युद्धपातळीवरील दुरुस्ती कामांद्वारे किंवा पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरू करण्याची कार्यवाही करावी. वीज यंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

सध्याची कोरोना लाट महावितरणकरिता अतिशय कसोटीची आहे. महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना सेवा देताना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घ्यावी. कोरोनाबाधित कर्मचारी व कुटुंबियांना सर्व प्रकारची आवश्यक वैद्यकीय व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी परिमंडल स्तरावरील समन्वय कक्षांमार्फत कामे सुरू आहेत. नियमित व कंत्राटी सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये प्रतिबंधात्मक उपायांकडे कोणतेही दुर्लक्ष करू नये, आरोग्याची गंभीरपणे काळजी घ्यावी, थोडीही लक्षणे दिसल्यावर ताबडतोब कोरोना चाचणी करून घ्यावी.