लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील संविधान सन्मान कृती समितीतर्फे शनिवारी (दि.२५) दुपारी १ वाजता संविधान सन्मान जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरूवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून झाली. त्यानंतर ही रॅली शहरातील जयस्तंभ चौक, गांधी प्रतिमा, चांदनी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक, नेहरु चौक मार्गावरून उपविभागीय कार्यालयावर पोहचली. रॅलीमध्ये विविध संघटनाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.ओबीसी सेवा संघ, ओबीसी संघर्ष कृती समिती, अवंतीबाई लोधी महासभा, युवा बहुजन मंच, युवा स्वाभिमान मंच, मुस्लिम मोर्चा, मुस्लिम छप्परबंद शाह बिरादरी संघटना, नॅशनल आदिवासी फेडरेशन, बामसेफ यासह विविध संघटना रॅलीत सहभागी झाल्या होत्या.शहरातील मुख्य मार्गावरुन ही रॅली उपविभागीय कार्यालयाजवळ पोहचली. यानंतर रॅलीचे रुपांतर सभेत झाले.येथे नामदेव किरसान, बबलू कटरे, अमर वºहाडे, नीलम हलमारे, दीपक बाहेकर, पुरूषोत्तम मोदी, हौसलाल रहांगडाले, अफजल शाह, गुड्डू हुसैनी आदींनी सभेला मार्गदर्शन केले. या वेळी संविधानाचा सन्मान व बचाव करण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अतुल सतदेवे यांनी केले.
संविधान सन्मान रॅलीतून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:24 PM