संतोष बुकावन।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : येथे १३२ केव्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र तयार करण्यात आले. या उपकेंद्राचे कामही पूर्ण झाले असून केवळ बटन दाबून सुरु वात करायची आहे. मात्र ते कुणाच्या हस्ते करायचे यासाठी जनतेची गळचेपी केली जात आहे. आता हा मुहूर्त केव्हा निघणार यासाठी अर्जुनीवासी आसुसलेले आहेत.येथे यापूर्वी 66 केव्ही. विद्युत उपकेंद्र होते. ते १३२ केव्ही. मध्ये पराविर्तत झाले. १३२ केव्ही. चे काम सुरू असताना काही प्रमाणात हालअपेष्टा झाल्या. आता काम पूर्ण होऊन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला व केवळ बटन दाबून केंद्र सुरू करण्याची औपचारिकता शिल्लक आहे. मात्र हे ग्रहणच सुटेना, पारेषण विभागाला कुणाची प्रतिक्षा आहे तेच कळायला मार्ग नाही. अर्जुनी-मोरगाव कार्यक्षेत्रातील अर्जुनी ते घुसोबाटोला दरम्यान १०४ ट्रान्सफॉर्मर आहेत. अर्जुनीसाठी साकोलीवरून ३३ केव्हीची मागणी असून प्रत्यक्ष २७ केव्ही. मिळत आहे. नवेगावबांधला तर २५ केव्ही च मिळत आहे.एकीकडे पाऊस येत नसून कृषीपंप बंद आहेत. वीज दाब बरोबर राहत नसल्याने विजेवर चालणारी उपकरणे निकामी ठरत आहेत. अनेकदा वीजपुरवठा रात्री-बेरात्री कधीही खंडित होतो. थोडासा जरी पाऊस आला अथवा हवा जोराने वाहायला लागली की वीजपुरवठा बंद केला जातो. बोंडगावदेवी येथे नवीन उपकेंद्राचे काम काही दिवसांपूर्वी सुरू होते. या परिसरातील राईसमिल तीन महिन्यांपासून बंदच होती. विज वितरण कंपनीचे अधिकारी ग्राहकांनी विचारणा केल्यावर उद्धट उत्तर देत असल्याची तक्र ार एका व्यावसायिकाने केली आहे.येथे १३२ केव्ही. उपकेंद्राचे काम सुरू आहे तेव्हापासून तालुक्यातील जनता उसनवारीच्या विजेवरच जगत आहे. सद्या साकोली येथून पुरवठा सुरू आहे. औद्योगिक, घरगुती व कृषी ग्राहकांना वीज दिली जात आहे. मात्र अधिक दाब वाढल्याने वेळीअवेळी पुरवठा खंडित होणे तसेच विजेवर चालणारी उपकरणे वारंवार बंद पडून त्यात बिघाड होणे अशा प्रकारात वाढ होत असल्याने जनता त्रस्त झाली आहे.सद्या शेतीचा हंगाम सुरू आहे वरु णराजा रु सला असून पाऊस नसल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. शेतकऱ्यांवर निसर्ग तर कोपला आहेच पण शासकीय यंत्रणाही कोपली आहे. उदघाटन व समारंभांसाठी शेतकरी, सर्वसामान्य जनतेचा बळी घेणे एवढेच नव्हे तर त्यांच्या उदरिनर्वाहाच्या साधनावरच वज्राघात करणे कितपत योग्य आहे. नेमका हा विलंब कुणाकडून होत आहे हा संशोधनाचा विषय आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांचे भांडवल करण्यासाठी लोकार्पणाचा देखावा निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रकार केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.तांत्रिक समस्यांमुळे उशीरराजकीय हेतूने मतांचे भांडवल करण्यासाठी लोकार्पणास विलंब केला जात आहे असा जनतेचा आरोप आहे अशी विचारणा केल्यावर प्रतिक्रि या देताना पारेषणचे अधिकारी संजय वाढवे यांनी या बाबीचा इन्कार केला. वनविभागाचे काही प्रश्न, लाखांदूर परिसरातील समस्या होत्या. बटनची कळ दाबून लोकार्पण करण्याच्या प्रक्रि येत काही तांत्रिक अडचणी होत्या त्या आता पूर्ण झाल्या असून लवकरच हे विद्युत उपकेंद्र सुरू होईल अशीही माहिती त्यांनी दिली.
लोकार्पणासाठी जनतेची गळचेपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:10 PM
येथे १३२ केव्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र तयार करण्यात आले. या उपकेंद्राचे कामही पूर्ण झाले असून केवळ बटन दाबून सुरु वात करायची आहे. मात्र ते कुणाच्या हस्ते करायचे यासाठी जनतेची गळचेपी केली जात आहे. आता हा मुहूर्त केव्हा निघणार यासाठी अर्जुनीवासी आसुसलेले आहेत.
ठळक मुद्देउपकेंद्रांना मुहूर्ताची वाट : अर्जुनीवासीयांच्या नजरा लागून