लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : येथील एका सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि.१) घडली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी सोमवारी (दि.३) सर्वपक्षीय देवरी बंदचे आवाहन करण्यात आले. यानंतर सकाळी ९ वाजता स्थानिक पंचशिल चौकातून उपविभागीय कार्यालर्यावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सर्व देवरी शहरवासीय सहभागी झाले होते. बालीकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.सोमवारी स्थानिक पंचशिल चौकातून देवरी तालुकावासीयांच्यावतीने जनआक्रोश मोर्चा सकाळी ९ वाजता काढण्यात आला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी स्वयंस्फूर्तपणे सकाळी ७ वाजतापासूनच महिला, पुरुष, आबाल वृद्ध पंचशिल चौकात गोळा व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर मोर्चाला सुरुवात होऊन पंचशिल चौक ते मसकºया चौक,बौद्ध विहार चौक,पोलीस ठाणे, कारगील चौक, दुर्गा चौक, बाजार लाईन, राणी दुर्गावती चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चामध्ये नागरिक सहभागी होऊ लागले त्यामुळे या मोर्चाला विराट स्वरुप प्राप्त झाले. यादरम्यान मोर्चेकºयांच्यावतीने आरोपी अश्विन मेश्राम याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे, अल्पवयीन बालिकेला न्याय मिळालाच पाहिजे, सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे. अबला नारी की एक ही पुकार बंद करो ये अत्याचार अशी नारेबाजी करीत हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर पोहचला. येथे विविध मान्यवरांनी घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. तसेच आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. या वेळी आमदार संजय पुराम, नगराध्यक्ष कौसल कुंभरे, कॉंग्रेस नेते सहषराम कोरोटे, महेश जैन, रमेश ताराम, संतोष तिवारी, प्रमोद संगीडवार, यादोराव पंचमवार, अॅड. प्रशांत संगीडवार, अॅड. भुषण मस्करे, डॉ. गुरु कापगते, डॉ. अनिल चौरागडे, अन्नू आफताफ शेख, विनोद अग्रवाल, राजू अग्रवाल, ओमप्रकाश रामटेके, गणेश बिंझलेकर, संतोष तुरकर, विजय मते, प्रविण दहिकर, रतिराम दरवडे, राजू गुप्ता, अॅड. गंगभोईर, दिलीप राऊत, गोपाल तिवारी, वैभव जैन, नरेश जैन, छोटू भाटीया, शेख कनोजिया, कमलेश पालीवाल, सविता पुराम, जायस्वाल, उषा शहारे, बाली राऊत, माया निर्वाण, भुमिता बागडे, देवकी मरई, समता सैनिक दलाच्या महिला कार्यकर्त्या, मुस्लीम महिला कार्यकर्त्या यांचा समावेश होता. या वेळी परिसरातील नागरिक हजारोंच्या संख्येत उपस्थित होते. जनसमुदायाच्या मार्गदर्शनानंतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी तहसीलदार विजय बोरुडे यांनी स्विकारले. मोर्चेकऱ्यांच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन उपस्थित जनसमुदायाला दिले. यादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणेदार कमलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
‘त्या’ नराधमाला फाशीची शिक्षा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 10:22 PM
येथील एका सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि.१) घडली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी सोमवारी (दि.३) सर्वपक्षीय देवरी बंदचे आवाहन करण्यात आले. यानंतर सकाळी ९ वाजता स्थानिक पंचशिल चौकातून उपविभागीय कार्यालर्यावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सर्व देवरी शहरवासीय सहभागी झाले होते. बालीकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
ठळक मुद्देनागरिकांचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा : घटनेचा तीव्र निषेध, बाजारपेठ कडकडीत बंद, सर्व राजकीय पक्षांचा सहभाग