लोकमत मुलाखत : जिल्हा साथरोग अधिकारी पटलेनरेश रहिले गोंदियापावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत विहीर, बोरवेल, नळ योजना मधील पाण्याची पातळी वाढत असते. गढूळ पाण्यामुळे सुक्ष्म जीवांची वाढ होते. त्यातून डायरीया, गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ, टायफाईड इत्यादी आजारांचा उद्रेक होतो. या आजारांवर आळा घालण्यासाठी नागरिकांनी शुध्द व सुरक्षीत पाणी व ताजा आहार घ्यावा जेणे करून या साथरोगांना आळा घालता येईल, असे आवाहन जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.भुमेश्वर पटले यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केले. शुध्द आणि संरक्षित पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ग्राम पंचायत, नगर परिषद यांची असते. परंतु या स्थानिक स्वराज्य संस्था काही वेळा आपल्या कामात दुर्लक्ष करीत असल्याने गावात साथरोग पसरतो. पावसाळ्याच्या तीन महिने पुरेल एवढ्या ब्लिचींग पावडरचा साठा ग्राम पंचायतींनी आपल्याकडे ठेवावा. ३३ टक्यापेक्षा जास्त क्लोरीनचे प्रमाण असलेले ब्लिचींग पावडर ग्राम पंचायतीने खरेदी करावे. ब्लिचींग पावडर खरेदीनंतर तपासणीसाठी प्रयोगशाळेत गोंदियाला पाठवावे. पाण्याची टाकी महिन्यातून तीन वेळा धुवून स्वच्छ करावी. पाईप, नळ व्हॉल्व लिकेज होणार नाही याची दक्षता घ्यावी, नळ योजनेंतर्गत ज्या गावाला पाणी पुरवठा करण्यात येते तो पाणी पुरवठा करण्याच्या एक तासाअगोदर क्लोरीनेशन करून ओ.टी. परीक्षण करून क्लोरीनचे प्रमाण योग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच पाणी पूरवठा करण्यात यावा. दूषित पाण्याचे स्रोतावर त्वरित शुध्दीकरणाची प्रक्रिया करावी. (अधिक वृत्त पान २ वर)११४ जोखीमग्रस्त गावांकडे विशेष लक्षजिल्ह्यात मागील तीन वर्षात सतत साथरोगाचा उद्रेक होणारी १७ गावे, यात्रा भरणारे १६ गावे व नदी काठावरील ८१ गावे असे ११४ गावे जोखीमग्रस्त असल्याचे आरोग्य विभागाने ठरवून त्या गावांसाठी स्पेशल प्लान तयार केला आहे. त्या गावांचा समन्वयक म्हणून त्या परिसरातील आरोग्य सेवक किंवा आरोग्य सेविका यांना ठेवण्यात आला आहे. उपकेंद्रातही औषध साठा उपलब्ध करून दिला आहे. जोखीम असलेल्या गावातील गरोदर माता, स्तनदा माता व शुन्य ते ६ वर्ष वयोगटातील बालकांची लाईन लिस्टींग तयार करण्यात आली असून त्यांच्याकडे विशेष लक्ष असल्याची माहिती डॉ.भुमेश्वर पटले यांनी दिली आहे.
साथरोग टाळण्यासाठी शुध्द पाणी, ताजा आहार
By admin | Published: June 25, 2016 1:36 AM