शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

फुलचूर-फुलचुरटोलाला लवकरच शुद्ध पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 12:38 AM

शहरालगत असलेल्या फुलचूर-फुलचुरटोला गावाला शहरासारख्याच सुविधा उपलब्ध करुन देऊन विकास करण्याचा आपला मानस आहे. ज्याप्रमाणे काँग्रेस सरकारच्या काळात कुडवा-कंटगी या गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : विविध विकास कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरालगत असलेल्या फुलचूर-फुलचुरटोला गावाला शहरासारख्याच सुविधा उपलब्ध करुन देऊन विकास करण्याचा आपला मानस आहे. ज्याप्रमाणे काँग्रेस सरकारच्या काळात कुडवा-कंटगी या गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. तशीच योजना फुलचूर-फुलचुरटोला या गावासाठी मंजूर करुन शुध्द पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले.पाठक कॉलनी फुलचुरटोला ते आंबाटोली फुलचूर रस्ता डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, पं. स. सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, माजी सभापती स्रेहा गौतम, योगराज उपराडे, सरपंच पुष्पलता मेश्राम, उपरसंपच जीवन बन्सोड, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, माजी सरपंच उर्मिला दहीकर, श्याम कावळे, इंदिरा कटरे, दिनेश तिडके, गंगाराम बावनकर, राजा बैस, रवी बोदानी, निशा उईके, अर्चना राऊत, उपमा पशिने, अशोक लिचडे, अशोक ईटानकर, मनिष गौतम, देवचंद बिसेन, दुर्गाप्रसाद नागपुरे, सुनिता सव्वालाखे, सत्यभामा कवास, राजेश कटरे उपस्थित होते.अग्रवाल म्हणाले फुलचूर परिसरात तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू झाल्याने जिल्हाभरातील विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येत आहे. यामुळे परिसरातील उद्योगाला चालना मिळण्यास मदत झाली. भविष्यात तंत्रनिकेतन महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करुन विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचा आपला मानस असल्याचे सांगितले. सीमा मडावी म्हणाल्या फुलचूर-फुलचुरटोला परिसराचा झालेला विकास हे आ. अग्रवाल यांच्याच प्रयत्नांचे प्रतीक आहे.तंत्रनिकेतन महाविद्यालय व बायपास मार्ग तयार करुन या परिसराचा चेहरा मोहरा बदलविण्याचे काम त्यांनी केल्याचे सांगितले. आ. अग्रवाल यांच्या माध्यमातून या परिसरात विविध कामे करण्यात आल्याने नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यास मदत झाली. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती सुध्दा याच गावातून करुन अग्रवाल यांनी या गावाचे महत्त्व वाढविल्याचे सांगितले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल