समाधान शिबिर : राजकुमार बडोले यांचे मार्गदर्शन सडक-अर्जुनी : शासनाच्यावतीने शेतकरी, शेतमजूर, महिला बचत गट यांचेशी संबंधित असणाऱ्या समस्या सोडविणे हाच समाधान शिबिराचा उद्देश असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले केले. महसूल विभागाच्यावतीने सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीत गुरूवारी आयोजित समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत फुंडकलवार, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स. सभापती कविता रंगारी, जि.प. सदस्य माधुरी पातोडे, रमेश चुऱ्हे, शीला चव्हाण, पं.स. उपसभापती विलास शिवणकर, पं.स. सदस्य गिरधारी हत्तीमारे, गायत्री इरले, इंदू कापगते, तहसीलदार व्ही.एम. परळीकर, खंडविकास अधिकारी आनंद लोकरे, तालुका कृषी अधिकारी पेशट्टीवार, वनपरिक्षेत्राधिकारी गोवर्धन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, महिला बालकल्याण अधिकारी बागडे उपस्थितीत होते. या शिबिरात अन्नपुरवठा शाखा, तहसील, भूमी अभिलेख, कृषी विभाग जि.प. एकात्मिक बाल विकास कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय, कृषी विभाग, वनविभाग कार्यालय, देना बँक, ग्रामीण बँक, महाराष्ट्र बँक, शाखा सौंदड, डव्वा, महावितरण केंद्र, सेतु केंद्र, पशुसंवर्धन विभाग, महिला बचत गटांनी विविध स्टॉल लावून नागरिकांना माहिती देत असून समाधान केले जात आहे. विशेष म्हणजे, शामसुंदर बोरकर हायस्कूल खोडशिवनीची विद्यार्थिनी विद्या राजेंद्र परशुरामकर हिला ९० टक्के गुण मिळाल्याने तिचा पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांकडून सन्मान करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
समस्या सोडविणे हाच शिबिराचा उद्देश
By admin | Published: June 18, 2016 1:04 AM