शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

परसटोलाच्या पडीत जमिनीवर फुलणार शेती

By admin | Published: October 10, 2016 12:29 AM

महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मध्ये निवड करण्यात

जल संधारणातून मिळाले ३७७.२० : जलयुक्त शिवार अभियानातून १२०.०४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्धनरेश रहिले ल्ल गोंदिया महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मध्ये निवड करण्यात आलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या परसटोला येथील खडकाळ जमीनीवर भरघोस पिक घेता येणार आहे. या गावातील ९० टक्के पडीत जमीन आहे. या गावात जलसंधारणाने ३७७.२० व जलयुक्त शिवार अभियानातून १२०.०४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध झाले आहे. अभियानांतर्गत गावात तहसील कार्यालयाच्या माध्यामतून मृदा व जल संधारणाचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. यात भात खाचर पुनर्जीवन, नाला खोलीकरण, बोडी दुरूस्ती, सीमेंट नाला बांध, जुने सीमेंटबांध, मामा तलावातील गाळ काढणे हे अनेक जलयुक्त शिवार अभियानात या गावात ३५ काम झाले आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या अतिदुर्गम परसटोला गावाची लोकसंख्या १२८४ आहे. नागरिकांची उपजिविका शेतीवर अवलंबून आहे. खरीप व उन्हाळी धानाची शेती, रबीत कडधान्याची शेती करण्यात येते. गावाच्या भौगोलीक क्षेत्र ११४२.८३ हेक्टर एवढे आहे. यापैकी १८०.२९ हेक्टरमध्ये खरीप पीके घेतली जातात. परंतु आता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वाहून जाणाऱ्या पाण्याला अडविल्याने सिंचन क्षेत्र वाढले आहे. गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषि विभागाने भात खाचर पुनर्जीवन चे १८, नाला खोलीकरणाचे ८, सीमेंट नाला बांध ३, जुने सीमेंट बांध व मामा तलावाचे खोलीकरण५, बोडी दुरूस्ती १ काम झाला आहे. जल संधारणाच्या सीमेंट नाला बांधमधून ५२ टीसीएम, नाला खोलीकरणातून २८ टीसीएम, बोडी दुरूस्तीतून ०.४० टीसीएम, भात खाचर पुनर्जीवनातून ४० टीसीएम पाणी जमा झाले आहे. गावातील म्हशी व नागरिकांना ४०२.९४ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज असते. परंतु जून्या जलसंधारणामुळे ३७७.२० दशलक्ष घनमीटर पाणी जमा झाला आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामामधून १२०.०४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध झाला आहे. गाव प्रगतीच्या वाटेवर आहे. कोरड्या विहिरींना मिळाले जीवन ४जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जमा झालेल्या पाण्यामुळे नाल्याच्या जवळ शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांनी नर्सरी लावल्या आहेत. पावसाने दडी मारताच काही शेतकऱ्यांनी धानासाठी नाल्याच्या पाण्याचा वापर केला. जलयुक्त शिवार अभिनामुळे या परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे.कोरड्या पडलेल्या विहीरींना पाणी आले आहे. परसटोला गावात १२४.३० हेक्टर मध्ये भात खाचर पुनर्जीवनाचे काम झाले आहे. पाणी जमीनीत मूरविण्याच्या वेळी रोवणी करण्यासाठी या पाण्याचा वापर झाला. तूळ व तिळ क्षेत्र वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. ओळखा थेंबभर पाण्याचे महत्त्व ४अवर्षण व अनियमित पावसामुळे जलस्तर खाली जाते. पिकावरही याचा परिणाम होतो. पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. शेतीसाठी भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जातो. परंतु भूजल पुनर्भरणावर लक्ष दिले जात नाही. या स्थितीत जलयुक्त शिवार अभियान जलस्तर वाढविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. पाण्याचे महत्व ओळखून पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे.