लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : जीर्ण अवस्थेत असलेल्या येथील ग्रामीण रुग्णालयाची अवस्था बघता पंंंंंंचायत समितीद्वारे मिळालेले स्वत:चे क्वॉर्टर रुग्णांच्या सोईकरिता बुधवारी (दि.१८) पंचायत समिती समिती सभापती सुनंदा बहेकार यांनी वैद्यकीय अधीक्षक गुल्हाने यांचे स्वाधीन केले. यावेळी माजी महिला बाल कल्याण सभापती सविता पुराम, भाजप तालुका अध्यक्ष प्रमोद संगीडवार, नगराध्यक्ष कौसम कुंभरे, नगरसेवक प्रविण दर्बेकार, यादोराव पंचमवार, प्रकाशचंद जैन, पं.स.उपसभापती गणेश सोनबोईर, पं.स.सदस्य मेहतरलाल कोराम, महेंद्र मेश्राम, संतोष बहेकार, वैद्यकीय अधीक्षक भागेश गव्हाणे, मानक श्रीवास्तव, लोकेश वाठीवा, डॉ. सचिन बनसोडे उपस्थित होते.३० वर्षापूर्वी तयार ग्रामीण रुग्णालयाची इमारत पूर्णपणे जीर्ण झालेली आहे. रुग्णांची समस्या लक्षात घेता आमदार संजय पुराम यांनी या बाबीकडे विशेष लक्ष देत शासनाकडून नवीन इमारतीकरिता १२.५० करोड रुपयाचा निधी मंजूर करवून घेतला. लवकरच भूमिपूजन होऊन नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. परंतु पावसाळ्यात रुग्णांची वाढती संख्या व रुग्णांची अवस्था बघून सभापती सुनंदा बहेकार यांनी शासनाकडून स्वत:साठी मिळालेला बंगला रुग्ण सेवेकरिता रुग्णालयासाठी दिला.त्यांच्या या सामाजिक बांधीलकीच्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतूक होत असून वैद्यकीय अधीक्षक व ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे. सभापतींच्या क्वार्टरमध्ये १० ते १५ बेडची सोय होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
रुग्णांच्या सेवेकरिता क्वॉर्टर केले खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:22 AM
जीर्ण अवस्थेत असलेल्या येथील ग्रामीण रुग्णालयाची अवस्था बघता पंंंंंंचायत समितीद्वारे मिळालेले स्वत:चे क्वॉर्टर रुग्णांच्या सोईकरिता बुधवारी (दि.१८) पंचायत समिती समिती सभापती सुनंदा बहेकार यांनी वैद्यकीय अधीक्षक गुल्हाने यांचे स्वाधीन केले.
ठळक मुद्देजोपासली सामाजिक बांधीलकी : सभापतींच्या कार्याचे शहरात कौतुक